साकोलीत झाला राजकीय भुकंप…!

64

🔳 साकोलीत झाला राजकीय भुकंप..!

◾ काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष होमराज कापगते व शहर अध्यक्ष अश्विन नशिने यांच्या राजीनामा

◾साकोली / महाराष्ट्र
07. 05. 2023
रिपोर्ट • आशिष चेडगे • उपसंपादक ग्लोबल महाराष्ट्र न्यूज

🔳 सविस्तर बातमी :- साकोली : तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष होमराज मार्कंडराव कापगते यांनी भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मोहन पंचभाई यांच्याकडे स्वखुशीने आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे तो मंजूर करून कामातून मोकळे करावे असे पत्र गुरुवार दिनांक ०४ मे रोजी दिलेले आहे. या अचानक दोन्ही तालुका व शहर अध्यक्षपदांच्या राजीनाम्याने साकोली काँग्रेसमध्ये राजकीय भुकंप झाला असून हे असे अचानक घडले कसे यावर विविध तर्कवितर्क लढविले जात असून आता शहरात विविध राजकीय चर्चेला उधाण आले आहे की आता तालुक्यातील व शहरातील नवा चेहरा कोणता यांकडे ही काँग्रेसच्या समस्त कार्यकर्त्यांचे लक्ष लागलेले आहे.
कुंभली जिल्हा परिषद क्षेत्राचे होमराज कापगते हे माजी जिल्हा परिषद सदस्य होते तसेच सध्या ते पंचायत समिती सदस्य आहेत साकोली पंचायत समितीचे सभापती पदासाठी ते दावेदार होते परंतु त्यांना मात्र पक्षाकडून अध्यक्ष पद देण्यात आलेले नाही. ०४ मे रोजी साकोली तालुका काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदाचा स्वखुशींनी राजनामा देत असल्याचे पत्र होमराज कापगते व शहर अध्यक्ष अश्विन नशिने यांनी जिल्हा अध्यक्षांना पाठवलेले आहे. आता या राजीनाम्यामुळे शहरात कॉंग्रेस कार्यकर्त्यांमधे विविध चर्चा सुरू झाली असून हे असे अचानक घडले कसे.? पुढील साकोली नगरपरिषदेतील निवडणूक लक्षात घेता व मागील ५ वर्षाचा साकोलीत अविकास बघता आता तर जनतेने मोठा उलटफेर करण्याचे संकेत दिले होते. कारण आजही जनतेच्या तोंडून वारंवार वाक्य निघतात की इतर लाखनी, देवरी, लाखांदूर या नगरपंचायतीचा शहरस्तरांवर झालेला आलीशान विकासाच्या दृष्टीने साकोली आज जैसे थे स्थितीत दिसत आहे म्हणून जनता पार संतापली होती आणि आता पुढील निवडणुकीत जनता मोठा बदल व सत्तेची उलटफेर करण्याचे संकेतही चौकाचौकात बोलून दाखवित आहेत. सध्या विविध चौकात कॉंग्रेस, महिला कॉंग्रेस, एनएसयुआय, युवक काँग्रेस कार्यकर्त्यांमधे अशी जोरदार चर्चा रंगली आहे की आता नवे तालुका अध्यक्ष व शहर अध्यक्ष कोण.? व त्यावरच साकोली पुढील नगरपरिषद निवडणूकीत नेतृत्वाची धुरा कोण सांभाळेल याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.