नागपुरात सेक्स रॅकेटचा भांडाफोड • पोलीसांनी केली अल्पवयीन मुलीची सुटका

80

🔳 नागपूरात सेक्स रॅकेटचा भांडाफोड • पोलीसांनी केली अल्पवयीन मुलीची सुटका

हुडको कॉलनीत चालवित होती ४३ वर्षीय महिला सेक्स रॅकेटचा व्यवसाय • नागपूर गुन्हे शाखेची कारवाई •

नागपूर / महाराष्ट्र
08. 05. 2023
रिपोर्ट • आशिष चेडगे – उपसंपादक ग्लोबल महाराष्ट्र न्यूज

सविस्तर बातमी : नागपूर / साकोली : नागपूर येथील जरीपटका हुडको कॉलनीत चालणा-या सेक्स रॅकेटचा नागपूर पोलिसांनी भांडाफोड केला आहे. गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागातर्फे ही धडक कारवाई करण्यात आली असून एका अल्पवयीन मुलीची सुटका करण्यात आली.
हुडको कॉलनी येथे आरोपी फरीदा मोहम्मद खान वय ४३ नावाची महिला गरीब मुलींना पैशाचे आमिष दाखवून त्यांच्याकडून देहव्यापार करवून घेत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली. फरीदा हिच मुलींना ग्राहक व जागा उपलब्ध करून द्यायची. पोलीसांनी सापळा रचला व शनिवार ०६ मे सायंकाळी एक डमी ग्राहक पाठविला, ग्राहकाने इशारा करताच तैनात पोलीसांच्या पथकाने फरीदा मोहम्मद खान हिला सौदा करतांना रंगेहाथ पकडून अटक केली. त
यावेळी तेथे एक अल्पवयीन मुलगी होती. फरीदाची कसून चौकशी केली असता तिने धनश्री उर्फ सोनी हिरामण वाघमारे वय ३४ रा. कबीरनगर नागपूर या महिलेच्या माध्यमातून ती अल्पवयीन मुलगी आणल्याचे सांगितले. पोलीसांनी धनश्री उर्फ सोनीला ही अटक केली. फरीदा मोहम्मद खान व धनश्री हिरामण वाघमारे यांच्या विरोधात पीटा तसेच पॉस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागपूर गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक सारीन दूर्गे, गुन्हे शाखा विशेष पथकाचे संतोष जाधव, अनिल अंबाडे, राशिद साजिद, भूषण झोडे, लक्ष्मण चैरे, मनिष रामटेके, सुधीर तिवारी, रिना जाऊळकर, पूनम शेंडे यांच्या पथकाने ही एक्शन कारवाई केली आहे.