साकोलीत महिला बचतगट अभ्यासवर्गाला २०० वर महिलांची उपस्थिती

55

महिला बचतगट अभ्यासवर्गात २०० च्या वर महिलांचा सहभाग

महिला गृह उद्योगातून मिळणार ग्रामीण महिलांना हक्काची बाजारपेठ

साकोली / महाराष्ट्र
दि. 06. 05. 2023
रिपोर्ट – आशिष चेडगे उपसंपादक ग्लोबल महाराष्ट्र न्यूज

सविस्तर बातमी :साकोली :- स्मार्ट व्हिलेज डेव्हलपमेंट सोसायटी साकोली एनजीओ तर्फे महिला बचतगट एकदिवसीय अभ्यासवर्गाचे ( ता. ०५. मे.) ला आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात साकोलीसह ग्रामीण क्षेत्रातील दोनशेहून महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होत बचतगटातून स्वयंरोजगारासाठी व आर्थिक प्रगतीची दिशा यावर मार्गदर्शनाचा लाभ घेतला.

Read more news 👇👇👇

साकोलीत महिला बचतगट अभ्यासवर्गाला २०० वर महिलांची उपस्थिती

साकोली तालुक्यातील सर्वं ग्रामीण क्षेत्रातील २०० च्यावर महिला बचत गटांच्या प्रतिनिधी, भगिनी या अभ्यासवर्गाला उपस्थित होत्या. अभ्यासवर्गाला मधुबाला साबू – राष्ट्रीय अध्यक्ष सेल्फ हेल्प ग्रुप सहकार भारती यांनी मार्गदर्शन केले. बचत गटाच्या महिलांच्या उत्पादित मालास योग्य बाजारपेठ मिळवून महिलांना हक्काची बाजारपेठ मिळवून देण्याचे त्यांनी आश्वासन दिले. प्रत्येक गावातील बचतगटाच्या १ – २ महिलांना प्रशिक्षण देऊन गावातील सर्व महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे ध्येय सहकार भारतीचे असल्याचे त्यांनी विदित केले. याबद्दल साकोली तालुक्यात पायलट प्रोजेक्ट सुरु करून जिल्ह्यातील सर्व बचत गटातील महिलांना रोजगार मिळवून देण्यात येईल. या पवित्र कार्यात आमची संस्था स्मार्ट व्हिडीएस को -ओर्डीनेटर चे काम करेल असे प्रतिपादन केले. येत्या १४ मे रोजी नागपूर येथे सहकार भारती तर्फे महिला बचत गटासाठी ५००० भगिनींचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे, त्या कार्यक्रमास विनोद तावडे, राष्ट्रीय महासचिव भाजप, मंगलदास लोढा मा.मंत्री महिला व बालविकास व अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी महिला स्वयंसहाय्य गटाच्या वस्तू ऑनलाईन पद्धतीने विकण्यासाठी फ्लिपकार्ट कंपनी सोबत करार करण्यात येणार आहे. त्यामुळे स्थानिक वस्तूंसाठी मोठी बाजार पेठ उपलब्ध होणार असल्याचे सांगितले. या एकदिवसीय अभ्यासवर्गाला कमलेश फरकुंडे व्यवस्थापाक (उमेद) साकोली पं.स, स्मार्ट व्हिलेज डेव्हलपमेंट सोसायटी संस्थापक अध्यक्ष प्रकाश बाळबुध्दे, निलम शर्मा प्रोजेक्ट मॅनेजर सहकार भारती, इंद्रायणी कापगते, माहेश्वरी नेवारे, वनिता डोये, कल्पना कापगते, आशा शेंडे, निशा इसापुरे व इत्यादी मान्यवर उपस्थित होते. अभ्यासवर्गाला संचालन डॉ नरेश कापगते यांनी केले.