साकोलीत वेडसर महिलेचा महाप्रतापी कारनामा • उभ्या कारचे कारचे फोडले काच

48

साकोली शहरात मनोरूग्णांचा वाढता महाप्रतापी हल्ला

चक्क उभ्या चारचाकी कारचे काच फोडले ; सुदैवाने व्यापारी बचावले ; नगरपरिषद ठेकेदारीत व्यस्त

साकोली / महाराष्ट्र
05. 05. 2023
रिपोर्ट : आशिष चेडगे • उपसंपादक ग्लोबल महाराष्ट्र न्यूज मिडीया

सविस्तर बातमी :- साकोली : साकोली शहरात काही वर्षांपासून इतरत्र फिरणा-या मनोरूग्णांच्या अनेक प्रचलित घटना घडल्या असतांनाच काल शुक्रवार ०५ मे दू. ०३:१५ ला साकोली पोलीस ठाणे समोरच नागपूर व्यापा-यांच्या उभ्या कारला एका वेडसर महिलेने चक्क मोठा दगडच मारीत पूर्ण काच फोडला सुदैवाने आत बसलेले चालक बचावले. अश्या अनेक घटना शहरात घडल्या असून याचा स्थानिक नगरपरिषदेला काही देणेघेणे नसून प्रशासन स्वतःच्या निविदा ठेकेदारीतच व्यस्त आहेत.
सविस्तर की जूने पंचायत समिती बाजूला व पोलीस ठाणे समोर गुप्ता यांची शितल कटपिस क्लॉथ स्टोअर असून काल शुक्रवार ०५ मे दू. ०३:१५ ला नागपूर गांधीबाग येथील साई एजन्सी मधून अमित सचदेव ४० व चालक मनिष भोरके ३८ रा. गांधीबाग नागपूर येथील व्यापाऱ्यांनी सर्व्हिस रोडवर सुझुकी बॅलिनो कार क्र. एम एच. ४९ बीआर. ५९२३ ही उभी करून समोर दूकानात कापडमाल ऑर्डर करीता गेले होते. तेवढ्यात एक अंदाजे २९ वर्षीय वेडसर महिलेने कार मागे जात एक भला मोठा दगड उचलून कारच्या मागील काचाला मारला यावेळी चालक मनिष भोरके हे कारमध्ये बसले होते व त्या मोठ्या दगडाने आणि काचांच्या तीक्ष्ण तुकड्यांनी थोडक्यात बचावले आहेत. असेच प्रकरण मागे लहरीबाबा मठ देवस्थान समोर नंदलाल पाटील कापगते महाविद्यालयातील इयत्ता ८ वीच्या विद्यार्थ्यांमागे एक पुरूष माथेफिरू काडी घेऊन धावला होता व ते विद्यार्थी बाजूलाच असलेले उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयात शिरून आपला बचाव केला होता. त्यावेळी पोलीस कार्यालयात महिला पोलीस रोशनी रोकडे व प्रेस प्रतिनिधी आशिष चेडगे यांनी त्या माथेफिरूला पिटाळून लावले होते हे विशेष. शहरात सध्या ६ ते ७ महिला पुरुष माथेफिरू वेडसर व्यक्ती इतरत्र कुठेही फिरत असून यांच्या महाप्रतापी व उपद्रवी कारनाम्यांमुळे रोडवर महिला पुरुष जनता, शिकवणी वर्गाला जाणा-या लहान मुलामुलींवर केव्हाही हे वेडसर माथेफिरू हल्ला करू शकतात, यातच कोणतीही जिवीतहानी झाल्यास जबाबदारी कोण घेणार.? सदर प्रकरणाची मुख्य जबाबदारी घेणारे नगरपरिषद प्रशासन सध्या स्वतःच ठेकेदारीत आणि कमिशनवर घरकुल चेक देयक काढण्यात हिस्सा दलालीत व्यस्त असून अश्या गंभीर व चिंताजनक प्रकरणांकडे यांचे थोडेही लक्ष नाही. या प्रकरणात एखाद्या विद्यार्थ्याला गंभीर दुखापती झाल्यास सर्वस्वी जबाबदारी नगरपरिषदेची राहील अशी कडक सुचना येथे उपस्थित जनतेने दिली आहे.
* ( Copyright Act. Do not Copy this News Global Maharashtra News Media )