साकोली : लैंगिक अत्याचाराच्या आरोपीस १० वर्षाचा सश्रम कारावास

48

साकोली : लैंगिक अत्याचार आरोपीस १० वर्ष सश्रम कारावास व दंड

सर्व स्तरांतून विधी व न्याय – साकोली पोलीसांचे होत आहे अभिनंदन ; आता आरोपींमध्ये भयकंप

साकोली / महाराष्ट्र 
04. 05. 2023
रिपोर्ट • आशिष चेडगे – उपसंपादक ग्लोबल महाराष्ट्र न्यूज

सविस्तर बातमी : साकोली : एका लैंगिक अत्याचाराच्या गंभीर गुन्ह्यांत आरोपीस अखेर न्यायालयाने दहा वर्षे सश्रम कारावास व दंड अशी शिक्षा ठोठावली असून साकोली पोलीसांच्या उत्तम कामगिरीने व शासकीय अधिवक्तांच्या शिक्षा तरतूद नियनाने या गंभीर गुन्ह्यांतील आरोपीस १० वर्षाचा कारावासाची शिक्षा न्यायालयाने ठोठावण्याबद्दल सर्व स्तरांतून न्याय विभाग आणि साकोली पोलीस दलाचे सर्वत्र कौतुकाभिनंदन होत असून आता अश्या गुन्हेगारांमधे कायमचे भय उमटले आहे हे विशेष.
सविस्तर की, साकोली पोलीसांत ०८/०१/२०१९ अपराध क्र. ८/१९ कलम ३६३ अन्वये आरोपी कमलेश अशोक गायधने वय २१ याने एका अल्पवयीन पिडीतेला पळवून नेण्याच्या उद्देशाने लाखनी बसस्थानक येथे आल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक धिरज खोब्रागडे व त्यांच्या चमुनी सदर आरोपीस ताब्यात घेतले होते. तत्कालीन साकोली उपविभागीय पोलिस अधिकारी प्रभाकर तिक्कस यांकडे तपास सुरू होता. तसेच न्यायालयात आज दि. ०४ मे २०२३ ला साकोली पोलीस निरीक्षक राजेश थोरात यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक धिरज खोब्रागडे यांनी आरोपीस पेशीवर हजर केले असता अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश भंडारा यांनी या लैंगिक शोषण अत्याचार गुन्ह्यातील आरोपीला अखेर १० वर्षाचा सश्रम कारावास आणि दंड अशी शिक्षा ठोठावली. सदर गुन्ह्याचा प्राथमिक तपास साकोली पोलीस उपनिरीक्षक धिरज खोब्रागडे, कारवाईस्तव तपास उपविभागीय पोलीस अधिकारी प्रभाकर तिक्कस यांनी केला. तर न्यायालयीन कामकाज विशेष सरकारी अधिवक्ता ॲड. दूर्गा तलमले व न्यायालयीन पैरवी म्हणून महिला पोलीस हवालदार चुनरीया भुरे यांनी काम पाहिले.
अश्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली साकोली पोलीसांनी कडक तपास करून न्यायालयात नियमानुसार प्रकरण दाखल करीत अखेर या गंभीर स्वरूपाचा गुन्हा करणा-या नराधम आरोपीला अखेर विधी व न्याय विभागाने अशी सश्रम कारावासाची कडक शिक्षा ठोठावल्याबद्दल माननीय कोर्ट विद्यमान न्यायमुर्ती महोदयांचे, साकोली पोलीस विभागाचे आणि विशेष सरकारी अधिवक्तांचे सर्व स्तरांतून न्याय केल्याबद्दल हार्दिक कौतुकाभिनंदन होत आहे हे उल्लेखनीय. या लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली झालेल्या कठोर शिक्षेबद्दल आता अश्या गुन्हेगारांमधे कायमचे भय संचारले असून असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे करायला आता गुन्हेगार अगोदर ही न्यायालयीन शिक्षा पाहून भयकंपित होतील हे खरे..!