साकोलीच्या शासकीय तंत्रनिकेतन कॉलेजचा अफलातून प्रकार चव्हाट्यावर

58

शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाचा अफलातून प्रकार चव्हाट्यावर 

दुरुस्तीच्या नावावर ०३ महिन्यांपासून विद्यार्थ्यांचे वर्गच घेतले नाही

साकोली / महाराष्ट्र
03. 05. 2023
रिपोर्ट : आशिष चेडगे • उपसंपादक ग्लोबल महाराष्ट्र न्यूज

सविस्तर बातमी – साकोली : शहरातील सेंदुरवाफा स्थित शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाची नुकतीच धक्कादायक बातमी समोर आली असून गत तीन महिन्यांपासून भाग २ व भाग ३ या सत्रातील संगणक विभागाचे वर्गच झाले नसल्याची धक्कादायक प्रकार समोर आला.
सदर महाविद्यालय प्रशासनाने दुरुस्तीच्या नावावर विद्यार्थ्यांच्या दैनंदिन वर्गावरच घाला घातला. त्यामुळे पालकांनी संताप व्यक्त केला आहे. शासकीय महाविद्यालयाच्या या अफलातून प्रकारामुळे विद्यार्थ्यांच्या भविष्यातील खेळ केला गेला असल्याचे बोलले जाते. ‘मे’ महिना म्हणजे महाविद्यालय परीक्षांचा काळ त्यामुळे सर्वच महाविद्यातील प्राध्यापक वृंदाचा आपला अभ्यासक्रम पूर्ण करण्याकडे कल असतो. प्रत्येकच महाविद्यालय सत्र संपण्यापूर्वी आपला अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना पूर्ण करून देतात. पण येथे तर चक्क महाप्रतापच घडविण्यात आला. फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल या तीन महिन्यांपासून या महाविद्यालयात संगणक विभागाचे वर्गच झालेत नाहीत. आता परीक्षा जवळ आल्याने भाग २ आणि भाग ३ या वर्गातील विद्यार्थ्यांचे वर्ग न झाल्याने अनेक विद्यार्थी तणावात आले आहेत. निमित्त काय तर विभागाची दुरुस्ती करावयाची आहे. आता बोला.! जेथे विधानसभा निवडणुकीची कधीकाळी मतदान मोजणी केली जात होती. एवढ्या भव्य दिव्य प्रशस्त महाविद्यालयात दुसऱ्या ठिकाणी व्यवस्था होऊ शकत नव्हती काय.? आता विद्यार्थी या विषयात गोल झालेच तर याची जबाबदारी कोणावर.? प्राचार्य की प्राध्यापक.! संबंधित प्राध्यापकांवर दोन वर्गातील विद्यार्थ्यांना शिकविण्याची जबाबदारी असतांना महाविद्यालय प्रशासन व्यवस्था का करू शकले नाही. ? सेंदुरवाफा स्थित आणि राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर अनेक वर्षापूर्वी शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली. तत्कालीन आमदार स्व. जयंतराव कटकवार यांच्या कार्यकाळात या महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली होती. भंडारा जिल्ह्यातील हे एकमेव शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय भव्य, दिव्य आणि सर्व शाखा विद्यार्थी संख्येने पूर्ण असतांना अलीकडे या महाविद्यालयाची शिक्षण व्यवस्था ढासळल्याचे लक्षात येते. येथील प्राचार्यांचे आपल्याच महाविद्यालयिन अंतर्गत येत असलेल्या प्राध्यापकावर लक्ष नाही. गत दोन-तीन महिन्यांपासून संगणक विभागाचे वर्ग होत नसतांनाही प्राचार्यांनी कोणतीही ठोस भूमिका घेतली नाही. असंख्य प्राध्यापक भंडारा, गोंदिया, नागपूर वरून येणे जाणे करीत असल्याने वेळेचा पत्ता नाही. कधीही या, कधीही जा असा शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात पोरखेळ सुरू आहे. विद्यार्थ्यांना वर्गात शिकवण्याकडे सध्या येथील प्राध्यापकांचा कल नाही. परिणामी एकीकडे महाविद्यालय प्रशासन विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळत आहे तर, दुसरीकडे विद्यार्थी पालकांच्या स्वप्नाशी देखील महाविद्यालय प्रशासन खेळ खेळत आहे. आज माजी आमदार स्व. जयंतराव कटकवार वरून बघत असतील तर म्हणत असतील ” याच साठी केला होता का अट्टाहास ” या विचित्र प्रकारावर आणि शिक्षणाचा पार खेळखंडोबा करणा-यांवर उच्चस्तरीय कारवाई करण्यात यावी अशी समस्त पालकांनी मागणी आहे.
( • Warning : Copyright Act for Do not Copy this Global Maharashtra News )