पोलीसांच्या एक्शन कारवाईत अट्टल बाईकचोरांस अखेर अटक

44

पोलीसांच्या एक्शन कारवाईत अट्टल बाईकचोरांस अटक

एलसीबी – साकोली – लाखनी पोलीसांची दमदार कामगिरी ; चोरीच्या २ दूचाकी जप्त ; साकोली घरफोडीतही होता आरोपींचा सहभाग

साकोली / महाराष्ट्र
03. 02. 2023
रिपोर्ट • आशिष चेडगे • उपसंपादक ग्लोबल महाराष्ट्र न्यूज

सविस्तर बातमी • साकोली : मोटारसायकल चोरीचा छडा लावण्याकरीता कर्तव्यावर असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला व साकोली लाखनी पोलीसांना मिळालेल्या गोपनीय माहितीद्वारे लाखनी परिसरात चोरीच्या मोटारसायकलने फिरणाऱ्या दोन अट्टल चोरांना ताब्यात घेऊन त्यांच्या जवळून चोरीच्या दोन मोटारसायकल व इतर साहित्य जप्त केले. सदर कारवाई दि. १ मे रोजी करण्यात आली.
धम्मराज मेश्राम २४ रा. सेलोटी व चेतन मेश्राम २३ रा. मानेगाव सडक ता. लाखनी असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन चिंचोळकर, पो. हवा. प्रदीप डहारे, नितीन महाजन, किशोर मेश्राम, नंदकिशोर मारबते, विजय तायडे, रमेश बेदुरकर, मंगेश माळोदे, सचिन देशमुख, जगदीश श्रावणकर हे दि. १ मे रोजी पोलीस स्टेशन साकोली हद्दीत चोरीला गेलेल्या मोटारसायकलचा छडा लावण्यासाठी गस्त करीत असतांना मिळालेल्या गोपनीय माहितीद्वारे एका विनाक्रमांकाच्या मोटारसायकलने लाखनी परिसरात फिरत असल्याची माहिती मिळाली. पोलीस पथकाने आरोपी धम्मराज मेश्राम व चेतन मेश्राम यांना विनाक्रमांकाच्या मोटारसायकलसह ताब्यात घेतले. दोघांची विचारपूस केली असता साकोली पोलीस स्टेशन हद्दीत सहा व कारधा पोलीस स्टेशन हद्दीत एक मोटारसायकल चोरी केल्याचे कबुली दिली. साकोली व लाखनी पोलीसांनी त्यांच्या ताब्यातून चोरीला गेलेली मोटारसायकल क्र. एमएच ४९ बीए ५८४३, व क्र. एमएच ४९ एडब्ल्यू ६४९४ तसेच गंजलेले लोखंडी साहित्य असा जवळपास ९८ हजार ८०० रुपयांचा माल जप्त केला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन्ही आरोपींना पुढील कारवाईकरीता साकोली पोलीसांच्या ताब्यात दिले आहे.साकोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेश थोरात हे दोन्ही आरोपींची कसून चौकशी करीत असून साकोलीत मागे झालेल्या घरफोड्यातही सदर आरोपींचा समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले. साकोली शहरातून संततधार पावसामुळे फायदा घेतला दोन दूचाकी चोरी गेल्यापासून साकोली पोलीस निरीक्षक राजेश थोरात व लाखनी पोलीस निरीक्षक मिलिंद तायडे यांची विशेष चमु दूचाकी चोरट्यांच्या मागावर होती आणि ३६ तासांतच स्थानिक गुन्हे शाखा पथकाच्या सहाय्याने साकोली व लाखनी पोलीसांनी एक्शन कारवाई करीत अट्टल बाईकचोरांस गजाआड करण्यात अखेर यश मिळविले आहे हे विशेष.