साकोली शासकीय क्रिडा संकुल बनले प्रेमीयुगुलांचा अड्डा

50

शासकीय परीसर साकोली क्रिडा संकुल बनले प्रेमीयुगुलांचा अड्डा

प्रभागातील लहान मुलींवर वाईट परिणाम ; महिलांनी यांच्या केली बंदोबस्ताची मागणी

साकोली / महाराष्ट्र
02. 05.2023
रिपोर्ट : आशिष चेडगे • उपसंपादक ग्लोबल महाराष्ट्र न्यूज

सविस्तर बातमी • साकोली : शहरातील नागरीवस्तीतील गजबजलेले तालुका क्रिडा संकुल हे सध्या टवाळखोर मुलांसह शालेय विद्यार्थीनींना सोबत घेत तासनतास येथे अशोभनीय वर्तणूक करीत असल्याने हे शासकीय महाविद्यालय व तालुका क्रिडा संकुल प्रेमीयुगुलांचे अड्डे बनत चालले आहे. या संतापजनक प्रकाराने येथे आजूबाजूला रहाणा-या पारीवारीक लहान मुलींवर यांचा वाईट परिणाम होऊ नये करीता समस्त पालकांनी या टवाळखोर प्रेमीयुगुलांचा येथून बंदोबस्त करण्यासाठी मागणी केली आहे.
सविस्तर की, शहरात जिल्हा परिषद हायस्कूल समोर पंचशील वार्ड येथे भव्य क्रिडा संकुल असून येथे सकाळी आणि सायंकाळी व्यायामासाठी व निसर्गरम्य परिसरात फिरण्यासाठी महिला पुरुष येतात. दूपारी या परीसरात शुकशुकाट असतो त्याचाच फायदा घेत काही महाविद्यालयातील विद्यार्थीनी आणि त्यांचे टवाळखोर मित्र चक्क तालुका क्रिडा संकुलातील आवारात व इतरत्र आडोश्याला बसून अशोभनीय वर्तणूक करीत असतात. हा संतापजनक प्रकार नगरपरिषदेला माहितही असून या गेटवर दूपारनंतर टाळे ठोकण्याचे कर्तव्य बजावले नाही. कारण समोरच आणि आजूबाजूला नागरी कुटुंबवस्ती असून या अशोभनीय संतापजनक प्रकाराने वार्डातील आणि या जिल्हा परिषद हायस्कूल परीसरातील लहान मुलींवर यांचा वाईट परिणाम होऊ शकतो. असाच प्रकार आज मंगळवार ०२ मे दू. ३. दरम्यान येथे काही टवाळखोर मुलांसह शालेय विद्यार्थीनीं बसल्या होत्या, यातच तिथे काही जागरूक नागरिकांनी त्यांना पिटाळून लावले. येथील काही ज्येष्ठांनी “दै. युवाराष्ट्र दर्शन” व ग्लोबल महाराष्ट्र न्यूज ला सांगितले की या कॉलेज महाविद्यालय परिसरात नेहमीच रोडछाप मजनूंचा धुमाकूळ असून काही ग्रामिण भागांतील महाविद्यालयीन तरूणी कॉलेज महाविद्यालय सुटल्यावर घरी न जाता नेहमी मोबाईलवरून चैटींग व संभाषण करीत या समोरच्या सुनसान क्रिडा संकुल व जिल्हा परिषद हायस्कूल परीसरातील आडोश्याला बसून अशोभनीय वर्तणूक करतात. याने जवळच असलेल्या प्रभाग वस्तीतील शिकवणी वर्गाला जाणा-या लहान मुलामुलींवर वाईट परिणाम होऊन गुन्हेगारीला थारा मिळेल तर या संतापजनक व शासकीय परीसरातील अशोभनीय वर्तणूकीवर प्रशासनाने अतितातडीने आळा घालण्यासाठी ठोस पाऊले उचलली पाहिजेत असे पालकवर्ग जनतेची ही रास्त मागणी केली आहे.