कार्यालयात दारू पिऊन येणाऱ्या पटवाऱ्यास तात्काळ निलंबित करा-शिवसेना उपतालुका प्रमुख जीवनदास गेडाम यांची मागणी…

75

कार्यालयात दारू पिऊन येणाऱ्या पटवाऱ्यास तात्काळ निलंबित करा-शिवसेना उपतालुका प्रमुख जीवनदास गेडाम यांची मागणी..

 

 

चंद्रपुर/महाराष्ट्र
दि. 27 अप्रेल 2024
रिपोर्ट :- अनुप यादव, ग्लोबल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

सविस्तर बातमी चंद्रपूर : कर्तव्यात कसूर करत कार्यालयीन वेळेतच दारू पिऊन येणाऱ्या नांदगाव येथील पटवाऱ्यास तात्काळ निलंबित करावे अशी मागणी पोंभुर्णा तालुका शिवसेना उपप्रमुख जीवनदास गेडाम यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.

प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केल्याप्रमाणे याबाबतीत थोडक्यात परंतु सविस्तर असे की, मुल तालुक्यातील परंतु पोंभुर्णा तालुक्यातील अनेक गावांचा समावेश असलेल्या नांदगाव येथील तलाठी कार्यालयातील टेकाम नावाचे पटवारी हे सातत्याने दारू पिऊन कार्यालयात येतात. अनेकदा त्यांना लोकांच्या दाखल्यावर सह्या मारण्याचे भान सुद्धा रहात नसल्याचे निदर्शनास आले आहे. दारूच्या नशेत तर्र असणाऱ्या या तलाठ्याचा बियर बार मधील एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. त्यावरून जीवनदास गेडाम यांनी तलाठी टेकाम यांना तात्काळ निलंबित करावे अशी मागणी केली आहे.नांदगाव हे गाव राजकीय दृष्ट्या अतिशय संवेदनशील आहे. या गावात भाजप आणि काँग्रेस या दोनच पक्षाचे बाहुबल्य आहे.

चंद्रपूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आणि विद्यमान काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष विनोद अहिरकर यांचे हे जन्मगाव आहे. पंचायत समितीचे माजी उपसभापती दशरथ वाकुडकर सुद्धा इथेच राहतात. त्यानंतर मुल तालुक्यात राजकीय व व्यापारी म्हणून प्रसिद्ध असलेले मंगेश मग्नुरवार, निलेश मगनुरवार सुद्धा याच भूमीतील रहिवासी. मातब्बर आणि दिग्गज नेतेमंडळी या गावात असले तरी या गावातील कर्मचारी कशाही पद्धतीने वागत असले तरी त्याकडे या धुरंधराचे लक्षच जात नाही. त्यामुळे कर्मचारी अत्यंत बेजबाबदारीने वागत असून त्यांच्या बेजबाबदारपणावर आळा घालावा अशी मागणी सुद्धा जीवनदास गेडाम यांनी केली आहे. आश्रम शाळा, जिल्हा परिषदेची शाळा, हायस्कूल, बँक, पोस्ट ऑफिस, दवाखाने, शिंचाळ विभागाच्या कार्यालय, तसेच अनेक विभागाच्या कर्मचाऱ्यांची वसाहत येथे आहे. त्याचप्रमाणे परिसरातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून नांदगाव ची ख्याती आहे हे येथे उल्लेखनीय.