श्रीक्षेत्र वढा येथे श्रमसंस्कार शिबिरात माजी सैनिक मनोज ठेंगणे सन्मानित : प्रा अशोक चरडे यांचे राष्ट्रीय कीर्तन संपन्न.

52

 

श्रीक्षेत्र वढा येथे श्रमसंस्कार शिबिरात माजी सैनिक मनोज ठेंगणे सन्मानित : प्रा अशोक चरडे यांचे राष्ट्रीय कीर्तन संपन्न.

देश रक्षणासाठी माज सैनिक मनोज ठेंगणे सारखे बलवान युवक तयार व्हावेत – कीर्तनकार प्रा. चरडे

चंद्रपूर (प्रतिनिधी )-

सविस्तर बातमी :-        शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था चंद्रपूर येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विशेष श्रमसंस्कार शिबिर श्रीक्षेत्र वढा येथे सुरू असून या शिबिरात सुप्रसिद्ध कीर्तनकार प्रा. अशोक चरडे (चिमूर )यांच्या राष्ट्रीय कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन सुप्रसिद्ध समाजसेवक माजी सैनिक मनोज ठेंगणे यांच्या हस्ते झाले . याप्रसंगी सरपंच किशोर वरारकर , मुख्य कार्यक्रम अधिकारी बंडोपंत बोढेकर, महेश नाडमवार , कार्तिक चरडे आदींची उपस्थिती होती.

ग्राम स्वच्छता आणि ग्रामोन्नतीकडे निरंतर गावातील युवकांनी विषयावर लक्ष दिले पाहिजे.व्यसनमुक्त जीवन जगत सहयोग वृत्तीने देशसेवा करावी, असे कळकळीचे आवाहन मनोज ठेंगणे यांनी केले तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी विश्वाला मानवतेचा संदेश दिला. देश निर्माण अर्थात ग्राम निर्मीतीसाठी नवयुवकांनी आपला सेवेचा आदर्श पुढे ठेवला पाहिजे असे मत कीर्तनकार ‌ प्रा. अशोक चरडे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष बंडोपंत बोढेकर यांनी प्रा. अशोक चरडे आणि मनोज ठेंगणे यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक करून शिबिराच्या माध्यमातून होत असलेल्या विविध प्रकारच्या मेंटेनन्स वर्क ची माहिती उपस्थितांना दिली.

 


और न्यूज पढ़ें 👇👇👇

गंभीर ;- वरोरा तालुका काँग्रेस के लिडर प्रमोद मगरे पर तहसीलदार कौटकर मेहरबान ?