बल्हारशाह वनपरिक्षेत्रात धुमाकुळ घालत असलेल्या नर भक्षक वाघाला जेरबंद..

67

बल्हारशाह वनपरिक्षेत्रात धुमाकुळ घालत असलेल्या नर भक्षक वाघाला जेरबंद..

महाराष्ट्र/चंद्रपूर
दि. 30 अप्रेल 2024
रिपोर्ट :- अनुप यादव, ग्लोबल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

सविस्तर बातमी :-

बल्हारशाह वनपरिक्षेत्रात मागील काही महिण्यापासुन बल्हारशाह कारवा परिसरात धुमाकुळ घातले असलेल्या व आता पर्यंत 4 इसमांचा बळी घेणारा T_86_M नर वाघाला जेरबंद करण्याची मोहिम युध्द पातळीवर सुरु होती. बल्हारशाह वनपरिक्षेत्रातील वनकर्मचारी हे दररोज वनात दिवस रात्र गस्त करुन T_86_M वाघाचा मागोवा घेण्याची कार्यवाही करत होते. गस्ती दरम्यान दिनांक 29 एप्रिल 2024 ला नियतक्षेत्र बल्हारशाह मधील वनखंड क्रमांक 494 मधील ट्रॅप कॅमऱ्या मध्ये सदर वाघ दिसुन आला.

वनपरिक्षेत्र अधिकारी, बल्हारशाह यांनी तात्काळ अधिनस्त सर्व वनकर्मचारी यांना सोबत घेवुन सदर वाघाला जेरबंद करण्याची मोहिम राबवुन दिनांक 29.04.2024 ला बल्हारशाह कारवा रोड चे वनात सेट अप लावण्यात आला. त्यानंतर सदर बाघ हा T_86M हा असल्याची खात्री करण्यात आली व त्याला सायंकाळी 6.30 वाजताचे सुमारास श्री. कुंदन पोडचलवार, पशुवैद्यकीय अधिकारी, वन्यजीव उपचार केन्द्र ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपुर यांचे मार्गदर्शनात शुटर अविनाश फुलझेले, वनरक्षक यांनी वाघाला गनव्दारे डॉट मारले. त्यानंतर आदेशकुमार शेंडगे, सहाय्यक वनसंरक्षक व वनपरिक्षेत्र अधिकारी नरेश भोवरे यांचे नेतृत्वात जेरबंद मोहिमेतील सर्व वनकर्मचारी यांना घेवुन डॉट मारल्यानंतर वाघाची शोध मोहिम राबविण्यात आली. नंतर सदर बेशुध्द वाघाची पशुवैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी करुन त्यास पिंजयात बंद करुन पुढील तपासणी करीता वन्यजीव उपचार केन्द्र, चंद्रपुर येथे नेण्यात आले. सदर वाघ हा अंदाजे 10 वर्षाचा असल्याबाबत पशुवैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले.

श्रीमती. स्वेता बोड्डु, उपवनसंरक्षक, मध्य चांदा वनविभाग, चंद्रपुर यांचे मार्गदर्शनात, आदेशकुमार शेंडगे, सहाय्यक वनसंरक्षक यांचे नेतृत्वात सदर मोहीम यशस्वी करण्याकरीता  नरेश भोवरे, वनपरिक्षेत्र अधिकारी, बल्हारशाह क.एन. घुगलोत, क्षेत्र सहाय्यक, बल्हारशाह, ए.एस. पठाण, क्षेत्र सहाय्यक, उमरी, व्ही.पी. रामटेके, क्षेत्र सहाय्यक, कारवा व वनरक्षक एस.एम.बोकडे, आर.एस. दुर्योधन, डि.बी.मेश्राम, टि.ओ. कामले, ए.बी.चौधरी, पि.एच.आनकाडे, एस.आर. देशमुख, बि.एम. बनकर, अति शिघ्र दल, चंद्रपुर येथील कर्मचारी, PRT पथक, इटोली, उमरी पोतदार, उमरी तुकुम, सातारा कोमटि, सातारा भोसले व रोजंदारी वनमजुर यांनी परिश्रम घेवुन मोहिम यशस्वीरित्या पार पाडली त्यामुळे सदर वाघाला जेरबंद करण्यास वनविभागास यश प्राप्त झाले.

बायोलॉजीस्ट नुर अली सय्यद व नितेश बावणे, रोजंदारी संरक्षण मजुर यांनी दररोज ट्रॅप कॅमेरे चेक करणे व T_86_M नर वाघाचा मागोवा घेण्याची उल्लेखणीय कामगीरी केली.

बल्हारशाह – कारवा लगत जंगल परिसरात हिंस्त्र वन्यप्राण्यांचा वावर असल्यामुळे नागरीकांनी वनात प्रवेश करु नये असे आवाहन वनविभागा मार्फत करण्यात येत आहे.