पुन्हा संगीता सेल्स च्या मामा ची चर्चा जोमात.!

103

पुन्हा संगीता सेल्स च्या मामा ची चर्चा जोमात.!

जिंदल पॉवर च्या भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या संगनमताने संगीता सेल्स चा मिलावट कोळश्याचा पुरवठा करण्याचा कारनामा !

 

चंद्रपूर/यवतमाल/वणी
दि. 15 फरवरी 2023
मुख्य संपादक : अनुप यादव ग्लोबल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

सविस्तर वृत :- मध्यप्रदेशातील जिंदल पॉवर ला ४५ हजार टन उच्च दर्जाचा कोळसा निलजई व गोवरी खाणीतुन पुरवठा करण्यात येणार आहे, हा कोळसा पुरवठा करण्याचा कंत्राट जिंदल पॉवर ने संगीता सेल्स दिला असुन यातील १५ हजार टन कोळसा जिंदल पॉवर ला संगीता सेल्स ने कोळसा पुरवठा केला आहे. जो १५ हजार टन कोळसा जिंदल पॉवर ला पोहोचविण्यात आला तो मिलावट करून पुरवठा करण्याचा कारनामा संगीता सेल्स ने केला असुन आता उर्वरित २५ हजार टन कोळसा पुरवठा करण्याच्या तयारीत संगीता सेल्स आहे. जिंदल पॉवर मिलावट करण्यात येणारा कोळसा पुरवठा झाला परंतु याची साधी कल्पना ही जिंदल पॉवर नाही, याचे आश्चर्य व्यक्त के ले जात आहे. काय आहे हा प्रकार त्याची सविस्तर वृत्तांत…!

मध्यप्रदेशात निगडी व विना येथे जिंदल या कंपनीचे पॉवर प्लाँट आहेत. नावाजलेली असलेल्या जिंदल कंपनीचे देशात मोठ- मोठे उद्योग आहेत. या उद्योगांसाठी त्यांना उच्च दर्जाचा कोळसा निलजई व गोवरी या खाणीतुन पुरवठा करण्याचे कंत्राट जिंदल प्राप्त केले असुन या खाणीतुन कोळसा मध्यप्रदेशापर्यंत ट्रान्सपोर्ट करण्याचे कार्य जिंदल पॉवर ने संगीता सेल्स ला दिले आहे.

 


असा होतो उच्च दर्जाचा कोळसा निकृष्ट !

संगीता सेल्स ला मिळालेल्या कंत्राटानुसार सरळ खाणीतुन हा कोळसा मध्यप्रदेशातील निगडी व विना या जिंदल कंपनीच्या पॉवर प्लॅन्ट पर्यंत पोहोचायला हवा. हा करार व नियम आहे. परंतु नियमांचे सर्रास उल्लंघन करून संगीता सेल्स आपल्या स्वतःच्या वणी व ताडाळी येथील कोल डेपो वर खाणीतुन आणलेला उच्च दर्जाचा कोळसा खाली करतो. त्यानंतर या उच्च दर्जाच्या कोळश्यामध्ये कोळश्याची चुरी, चारकोल, ब्लैक डस्ट मिळविली जाते. व तो कोळशा जिंदल पॉवर ला पोहोचविला जात आहे. उरलेला उच्च दर्जाचा कोळसा खुल्या बाजारात मोठ्या दराने विकला जातो. यातुन संगीता सेल्स करोडो रूपयांची अवैध कमाई करीत आहे.

जिंदल पॉवर चे वरिष्ठ अधिकारी संशयाच्या घेऱ्यात ?

मिळालेल्या माहितीनुसार कोळश्याचा दर्जा कसा आहे याची तपासणी करण्यासाठी जिंदल पॉवर ची स्वतःची स्वतंत्र यंत्रणा आहे. अरूणकुमार गोयल या पदाधिकाऱ्याची संगीता सेल्स शी घनिष्ठ संबंध असल्याचे सांगण्यात येते. हेच अरुणकुमार गोयल कोळश्याचा दर्जा तपासणी करणाऱ्या जिंदल च्या यंत्रणेला ‘मॅनेज’ करून संगीता सेल्स ला अतिरिक्त मुनाफा मिळवून देत असुन जिंदल पॉवर च्या वरिष्ठ संचालकांना धोक्यात ठेवत असल्याचे अधिकृत वृत्त आहे.

 

संगीता सेल्स चा लय भारी ‘मामा’!

वादग्रस्त व ब्लॅक लिस्टेड असलेल्या संगीता सेल्स ने या सगळ्या हेराफेरी व काळ्या बाजारीसाठी विशेष माणसांची नियुक्ती केलेली असल्याचे सांगण्यात येते. त्यातील ‘मामा’ हा लय भारी आहे. तो वणी येथील संगीता सेल्स च्या कोल डेपो चे काम सांभाळतो. इकडून भी दलाली आणि तिकडून भी दलाली ही या ‘मामा’ची काम करण्याची अजब तऱ्हा आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा ‘मामा’ संगीता सेल्स च्या प्रोपायटर चा नातेवाईक असुन अत्यंत विश्वासाचे असे कॅरेक्टर या सगळ्या कामाचे मुख्य सुत्रधार असल्याची माहिती आहे.

 

कोळश्याची काळ्या कमाईत लाखोची कमाई तर करोडोची माया !

कोळश्याच्या काळ्या कमाईत लाखो कमाई असुन करोडोची माया जमविली जात असुन या मिलावट कोळश्यामुळे विज उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होते. प्रदुषणाचा प्रश्न हा वेगळा असतो. त्यातुन सामान्य जणांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असुन संबंधित विभागाचे अधिकारी ‘अर्थ’पूर्ण व्यवहारातुन गप्प असतात. परंतु जिंदल च्या सारख्या मोठ्या ग्रुप कडून या गैरप्रकाराकडे होत असलेल्या डोळे झाक मुळे आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे.

आत्ता पुन्हा 45 हजाराचा जिन्दल पावर चा डिपो वाणी क्षेत्राच्या मुंगोली कोळस्या खानीत जमा झालेला आहे. आणि संगीता सेल्स चा मामा पुन्हा बनावटी कोळस्या साठी नियोजन कराले झोमात भीडलेला आहे.


और न्यूज पढ़ें👇👇👇

संगीता सेल्स के “मामा”_ भांजे के कारोबार में चार चांद लगाते हुए? ट्रांसपोर्टिंग के आड़ में जिन्दल पावर को हजारों करोड़ों की चंम्पत.?