• क्रांतिवीर पत्रकाराची साकोलीत “लव्हली नेचर स्टोरी”

68

क्रांतिवीर पत्रकाराची लव्हली नेचर स्टोरी

एक झाड लाऊन १७ फोटो चमकविणा-यांच्या तोंडावर पत्रकार “रवि” ची जबरदस्त चपराक 

 📡 साकोली / महाराष्ट्र 13. 05. 2023 रिपोर्ट : आशिष चेडगे • उपसंपादक ग्लोबल महाराष्ट्र न्यूज

 सविस्तर बातमी :- साकोली : काही वर्षांपूर्वी नाना पाटेकर आणि डिंपल कपाडिया यांचा “क्रांतिवीर” नावाचा चित्रपट येऊन गेला. या चित्रपटात डिंपल कपाडिया पत्रकाराच्या भूमिकेत राहून सामाजिक अन्यायाला वाचा फोडण्याचे काम प्रामाणिकपणे करीत असते. अर्थातच समाजसेवेचे काम करीत असते. पत्रकारितेचा धर्म हा समाजसेवेचा खरा धर्म आहे यात शंका नाही. परंतु याहीपलीकडे समाजसेवा कशी असू शकते, याचे प्रत्यंतर “क्रांतिविर पत्रकाराची लव्हली नेचर स्टोरी” या रूपात समोर आली आहे. पत्रकार असून सुद्धा या अभ्यासू, डॅशिंग पत्रकाराने आपल्या समाजसेवेचा कधीही डंका पिटला नाही. जवळपास १ कि.मी. अंतरापर्यंत विविध प्रकारची झाडे लावून खऱ्या अर्थाने शासकीय योजनेच्या वृक्ष संवर्धनाला हातभार लावला. केवळ झाडे लावलेच नाही तर ती जोपासली, त्याची निगा राखली, आज ही झाडे ५ ते ६ वर्षांची झाली आहेत. या झाडाच्या सावलीत अनेक वाटसरू, पशुपक्षी, जनावर विसावा घेतात. झाडे लावून फोटो काढणे. नंतर त्याची प्रसिद्धी करणे. त्यानंतर त्या झाडाचा पत्ता नसतो. मात्र आमच्या या पत्रकार मित्राने अशा बेगडी आणि चमकोगिरी आणि वृक्षप्रेमीचा आव दाखवणाऱ्यांना सणसणीत चपराक आपल्या कार्यातून दिली. ते नाव आहे रवी आनंदराव भोंगाणे सध्या ते आकाश तरंग साप्ताहिक मध्ये सहसंपादक म्हणून कार्यरत असून सध्या ते चौफेर विषयांवर अभ्यासू लेखन करीत आहेत. २०१७ पासून त्यांनी आई “शकुंतला” यांच्या स्मृती प्रित्यर्थ हा उपक्रम सुरू केला तो अजतागत कायम आहे. रोज झाडांना पाणी टाकने, झाडांकडे लक्ष देणे, त्यांची निगा राखणे, जनावरापासून संरक्षण करणे, झाडे व्यवस्थित आहे की नाही ते बघणे, अशी त्यांची नित्यांची कामे आहेत. आंबा, जांभूळ, कडूलिंब,भुईनिंब, गुलमोहर, वड, पिंपळ, केळी, बदाम, कदम,करंजी, या व्यतिरिक्त फुलांची झाडे यासारखी जवळपास ७० ते ८० झाडांची जोपासना करून त्यांनी साकोली नगरपरिषदला ओलौकिक भेट दिली. भेट दिली यासाठी की, सदर १ कि.मी.चा रस्ता तलाव सौंदर्यकरणाच्या प्रतीक्षेत आहे. या रस्त्यावर नगरपरिषद वृक्ष लागवड करणार होते. त्या अगोदर रवि भोंगाने यांनी गेली ५ वर्षापासून मेहनत करून नगर परिषदेला एक प्रकारचे आंदन दिले. याबाबतीत विशेष बाब अशी की, लावलेल्या झाडांना कुंपण करणे, त्या झाडांना साड्या आणि ओढणी लावून जनावरापासून संरक्षण करणे,स्वतः झाडांसाठी गड्डे खोदणे, स्वतः इकडून तिकडून झाडे आणून ती लावणे, विशेष म्हणजे कुणाचीही मदत न घेता एवढे अद्भुत आणि नवल करणारे मोठे कार्य त्यांनी एकट्याने करून दाखविले. आज ही झाडे ५ ते ६ वर्षाची झाली आहेत. ही झाडे आहेत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील एकोडी फाटा पासून तलावाच्या बाजूने जाणाऱ्या दोन्ही बाजूला कुणाला जर ही झाडे दिसली तर ती हमखास रवी भोंगाने यांनी जोपासलेली आहेत. जवळपास १ कि.मी. अंतरावर ही झाडे जगवून, त्या झाडांचे संवर्धन करून समाजासमोर खऱ्या अर्थाने वृक्षप्रेमी म्हणून पत्रकारितेच्या क्षेत्रात नजराना सादर केला. एवढे करूनही रवी भोंगाने जसे आहेत तसेच आहेत. त्यांच्यात कुठलाही फरक पडला नाही. त्यांनी झाडे लावली, जगवली, संवर्धन केले म्हणून त्यांनी कधीही मोठेपणा दाखविला नाही हे विशेष. एका पत्रकाराने ५ वर्षापासून १ कि.मी. अंतरापर्यंत झाडे जगवल्याची किमया कदाचित पत्रकार क्षेत्रातील पहिल्यांदाच असेल.अशा आमच्या वृक्षप्रेमी, समाजसेवी, साहित्यिक, लेखक, कवी, डॅशिंग पत्रकाराचे अभिनंदन.