घरकुल लाभार्थीनी शासनातर्फे मोफत वाळूचा लाभ घ्यावा – ॲड. मनिष कापगते

53

• घरकुल लाभार्थीनी शासनातर्फे मोफत वाळूचा लाभ घ्यावा – ॲड. मनिष कापगते

साकोली / महाराष्ट्र
12. 05. 2023
रिपोर्ट : आशिष चेडगे • उपसंपादक ग्लोबल महाराष्ट्र न्यूज

• सविस्तर बातमी – साकोली : साकोली तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागातील मंजूर घरकुल लाभार्थीनी शासनातर्फे मोफत वाळू योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करुन लाभ घेण्याचे आवाहन माजी नगरसेवक ॲड. मनिष कापगते यांनी केले आहे.
साकोली तहसील कार्यालयातील खनिज विभागावतीने मंजूर घरकुल लाभार्थ्यांसाठी मोफत रेती उपलब्ध व्हावी यासाठी साकोली तालुक्यातील खंडाळा व सासरा रेतीघाटांवरून पाच ब्रास वाळू मोफत देण्यात येत असून घरकुल लाभार्थीनी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पुढील www.mahakhanij.maharashtra.gov.in वर जाऊन – Application – he ficiary Praposal वर जाऊन आपले आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक पर्याय निवडून अर्ज उघडावे, योजनेचे नाव, नोंदणी क्रमांक, मंजूरी क्रमांक, योजना मंजूर दिनांक ही माहिती भरावी. यात आपला आधार कार्ड लिंक नसल्यास जवळील आधार कार्ड सेंटर बैंकेत भेट देत आपला आधार मोबाईलला क्रमांक लिंक करून घ्यावा आणि या मोफत वाळू योजनेचा सर्व गोरगरीब घरकुल लाभार्थ्यांनी याचा लाभ घेण्यासाठी माजी नगरसेवक ॲड. मनिष कापगते यांनी “ग्लोबल महाराष्ट्र न्यूज” द्वारे जनतेला आवाहन केले आहे.