साकोलीत राशनची दलाली बंद न झाल्यास अन्न विभागाला टाळे ठोकू – डॉ. अजयराव तुमसरे

134

🛑 साकोलीत राशनची दलाली बंद न झाल्यास अन्न विभागाला टाळे ठोकू – डॉ. अजयराव तुमसरे

🔳 गरीब राशन कार्ड धारकांना केली जाते राशन सुरू करण्यासाठी साहेबांच्या नावावर ५ हजारांची मागणी

• साकोली / महाराष्ट्र
10. 05. 2023
रिपोर्ट : आशिष चेडगे • उपसंपादक ग्लोबल महाराष्ट्र न्यूज

• सविस्तर बातमी : साकोली : येथे अन्न पुरवठा विभागाचा संतापजनक प्रकार चव्हाट्यावर आला असून नविन कार्ड बनलेल्या गोरगरीब राशन कार्ड धारकांना काही दलाल दूकानदारांकडून राशन अन्न धान्य सुरू करून देण्यासाठी “साहेबांनाही द्यावे लागते ५००० रू द्या, तेव्हाच राशन सुरू करून मिळेल” अशी मागणी केली जात असल्याचे संबोधन प्रत्येक काही अवधीपुर्वीचे कार्डधारकांकडून होत आहे. हा गोरगरीबांना लूबाडण्याचा प्रकार तातडीने बंद करावा अन्यथा समंधित विभागाच्या कर्मचाऱ्यांवर व काही दलाल दूकानदारांवर फौजदारी गुन्हा दाखल करून साकोली तहसील कार्यालयातील अन्न पुरवठा विभागाला ताबडतोब टाळे ठोकण्याचा संतप्त इशारा कृषि उत्पन्न बाजार समिती संचालक डॉ. अजयराव तुमसरे यांनी दिला आहे.
सविस्तर की, साकोली शहरी व ग्रामीण क्षेत्रातील मागील ३ वर्षांपासून तयार झालेल्या केसरी कार्ड धारकांना राशन मिळत नाही व नुकतेच १ वर्षाआधी नव्याने बनलेल्या कार्डांना राशन मिळत आहे. पण संतापजनक प्रकार हा की तीन वर्षांआधीच्या कार्ड धारकांना सांगितले जाते की राशन उपलब्ध करायचे असेल तर ५ हजार रुपये लागतील कारण साहेबांनाही द्यावे लागते असे काही दलाल दूकानदार गोरगरीब राशन लाभार्थ्यांची राशन देण्यासाठी अडवणूक करून राशनाचा लाभ देण्यासाठी नकार देतात. पाच हजार रुपये दिले तरच राशन सुरू करू अशी सर्रासपणे गोरगरीबांकडून लूटमारीचा व्यवसाय सुरू असून यात काही तहसील कार्यालय येथील समंधीत विभागाच्या कर्मचाऱ्यांचा हिस्सा असल्याचे राशन कार्ड धारकांत बोलले जात आहे. शासनाच्या सर्वांसाठी अन्न पुरवठा राशन योजनेला हे काही दलाल काही अवधीपुर्वीचे झालेल्या राशन कार्ड नावाखाली अशिक्षित गोरगरीबांना नविन ५ हजारांचा वसुली फंडा देत सर्रासपणे राशन लाभार्थी गोरगरीबांकडून अवैधरित्या वसुली करणाऱ्या दलाल व त्यात ५ हजारांच्या हिस्सेदारीतील कर्मचारी व काही दूकानदारांनी हा गोरगरीबांकडून संतापजनक लूटमारीचा व्यवसाय बंद करून शासकीय नियमानुसार तहसिलदार यांनी तातडीने चौकशी करून गोरगरीब सर्व जूने राशन कार्ड धारकांना व लाभार्थ्यांना राशन देण्यात यावे. अन्यथा समंधित विभागाच्या कर्मचाऱ्यांवर व काही दलाल दूकानदारांवर फौजदारी कारवाई करून अन्न पुरवठा विभागाला टाळे ठोकण्याचा इशारा कृषि उत्पन्न बाजार समिती संचालक डॉ. अजयराव तुमसरे यांनी दिला आहे. कारण काही दिवसांपासून हा गोरगरीबांना ५ हजारांची साहेबांना द्यावे लागते असा फंडा साकोली सेंदूरवाफा शहरातील चौकाचौकात गाजत होता हे उल्लेखनीय.
[ ⚠️ – Warning Do not Copy this Global Maharashtra News Media a Copyright Act ]