धक्कादायक : I Love Sakoli गार्डनमध्ये आढळतात दारूच्या बाटल्या

89

🛑 I Love Sakoli गार्डनमधे आढळतात दारूच्या बाटल्या 

कॉलेज रोड साकोली महाविद्यालय परिसरात संतापजनक प्रकार उघडकीस : महाविद्यालयीन तरूणींसोबत अनुचित प्रकार घडल्यास जबाबदारी कुणाची.?

⭕ साकोली / महाराष्ट्र 11. 05. 2023 रिपोर्ट : आशिष चेडगे – उपसंपादक ग्लोबल महाराष्ट्र न्यूज

⭕ सविस्तर बातमी : साकोली – शहरातील कॉलेज महाविद्यालय या नेहमी विद्यार्थ्यांच्या वर्दळीच्या ठिकाणी व सार्वजनिक “आय लव्ह साकोली” या सौंदर्यीकरण बालोद्यानात आज गुरुवार ११ मे रोजी सकाळी ०५:२० ला प्रतिनिधींनी फेरफटका मारत असताना चक्क दारूच्या बाटल्या व इतर खाद्य पॉकीटे आढळून आल्या. अश्या जनतेच्या सकाळी व संध्याकाळी निवांत बैठकमय सार्वजनिक स्थानावर असा धक्कादायक प्रकार चव्हाट्यावर आल्याने जनतेत संताप व्यक्त होत असून या बालोद्यानात जवळीलच कॉलेज महाविद्यालयीन मुली फेरफटका मारायला येतात आणि अश्या मद्यपींच्या या कारस्थानामुळे विद्यार्थींनींसोबत काही अनुचित प्रकार घडला तर जबाबदारी कोण घेणार.? हा गंभीर प्रकार तातडीने बंद करून बालोद्यानात नगरपरिषदेने चौकीदार ठेवण्याची मागणी जनतेने केली आहे. आज गुरुवार ११ मे सकाळी ०५:२० ला अचानक “ग्लोबल महाराष्ट्र न्यूज” प्रतिनिधीने आय लव्ह साकोली या सौंदर्यीकरण बालोद्यानात फेरफटका मारताना या बालोद्यानाच्या आतील हिरवळ जागेत दोन दारूच्या बाटल्या, खाद्य पॉकीटे आढळून आले. याचाच अर्थ असा की दररोज सायंकाळी पासून येथे काही आंबटशौकीन मद्यपी या सार्वजनिक बगिच्यामधे बसून यथेच्छ मद्य प्राशन करून वातावरण दूषित करतात, या बालोद्यानात सायंकाळी जवळील प्रभागातील महिला पुरुष नागरिक व शाळकरी मुली फिरायला येतात. जवळच सायंकाळच्या शिकवणी वर्गाला जाणा-या विद्यार्थीनी मुलींसोबत अश्या धक्कादायक प्रकारामुळे अनुचित गुन्हेगारीला थारा देणारा गंभीर प्रकार घडला तर याची जबाबदारी कुणाची.? हा संतप्त प्रश्न महिला नागरीकांनी उपस्थित केला आहे. येथे इंग्रजी दारूच्या बाटल्या दिसल्या त्यावेळी जवळच राहणारी महिला फुल तोडत होती व त्यांच्या ही लक्षात हा धक्कादायक प्रकार समोरच दिसला. सार्वजनिक ठिकाणी बालोद्यानात बसून मद्य प्राशन करणे हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा असून सदर संतप्त प्रकार तातडीने बंद करून या सौंदर्यीकरण बालोद्यानात नगरपरिषदेतील झोपलेल्यांनी तातडीने चौकीदार नेमून द्यावा अशी मागणी येथील आजूबाजूच्या महिला पुरुष नागरीकांनी केली आहे.