“मन की बात” ने आम्हाला मानवतेशी जोडण्याचा मार्ग दिला – डॉ. ब्रम्हानंद करंजेकर

58

“मन की बात” ने आम्हाला मानवतेशी जोडण्याचा मार्ग दिला – डॉ. ब्रम्हानंद करंजेकर

बाजीरावजी करंजेकर कॉलेज ऑफ फार्मसी साकोलीत “मन की बात” थेट प्रक्षेपण

साकोली / महाराष्ट्र
01. 05. 2023
रिपोर्ट : आशिष चेडगे • उपसंपादक ग्लोबल महाराष्ट्र न्यूज मिडीया

  • सविस्तर बातमी : साकोली :- बलाढ्य भारताचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जनतेशी व विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधणा-या “मन की बात” ने आम्हाला मानवतेशी जोडण्याचा मार्ग दिला असे प्रतिपादन ज्येष्ठ शिक्षण समाजसेवक डॉ. ब्रम्हानंद करंजेकर यांनी काल रवि. ( ३०. एप्रिल.) ला मन की बात या बाजीरावजी करंजेकर कॉलेज ऑफ फार्मसी साकोलीत थेट प्रक्षेपण कार्यक्रमात बोलतांना केले.
    यावेळी बाजीरावजी करंजेकर कॉलेज ऑफ फार्मसी साकोली या शिक्षण संस्थेत असंख्य विद्यार्थी आणि शिक्षकवृंद, अध्यापक, प्राध्यापक, प्राचार्य हजर होते. ज्येष्ठ शिक्षण समाजसेवक डॉ. ब्रम्हानंद करंजेकर यांनी सांगितले की प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या “मन की बात” थेट प्रक्षेपण कार्यक्रमाचे १०० वे भाग पूर्ण केले असून प्रत्येक कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना व सर्व देशवासियांना थेट संवाद साधत असल्याने मनातील भावना व्यक्त करतांनाच मानवतेशी जोडण्याचा मार्ग दाखविला आहे. सदर “मन की बात” संवाद कार्यक्रमात बाजीरावजी करंजेकर शिक्षण संस्था साकोलीतील सर्व विभागातील शिक्षणवृंद आणि विद्यार्थी थेट प्रक्षेपण कार्यक्रमात उपस्थित होते.