दिनकरनगर साकोली बसला अपघात ; चालकाची समयसुकता ; अनर्थ टळला

59

दिनकरनगर साकोली बसला अपघात ; अनर्थ टळला, ४० प्रवासी थोडक्यात बचावले

साकोली जवळील पीके विद्यापीठ समोरील घटना

साकोली / महाराष्ट्र
30. 04. 2023
रिपोर्ट • आशिष चेडगे – उपसंपादक ग्लोबल महाराष्ट्र न्यूज

सविस्तर बातमी :- साकोली : रात्रीपासून सुरु असलेल्या अवकाळी पावसामुळे चंद्रपूर राज्य महामार्गावरून साकोलीकडे येणारी दिनकरनगर – साकोली बसला रवि. ता. ३०. एप्रिल स. ९:३० दरम्यान अपघात झाला. बसमधे सुमारे ४० प्रवासी होते आणि सुदैवाने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.
सविस्तर की २९ एप्रिल सायंकाळ पासून सुरू झालेल्या अवकाळी पावसामुळे साकोली – लाखांदूर मार्गावर दररोजच्या रेती वाहतूक चालणा-या बैलबंड्यांमुळे रोडावर पडणारे शेणांना ओलावा व गुळगुळीतपणा आला वरून या राज्य महामार्गाला दोन्ही बाजूला कमी शोल्डरबाजू असून मातीही घसरणयुक्त झाली. यातच काल रवि. दि. ३० एप्रिल स. ९:३० दरम्यान साकोली आगाराची बस क्र. एम एच ४० एन. ८८७३ दिनकरनगर – साकोली बस ४२ प्रवासी घेऊन येत असता पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ या अंधवळणावरून रोडवर शेणांमुळे बस घसरत खाली झुडपांमध्ये जात चालकाने समयसूचकतेने बसवर ताबा मिळवित एका सुक्ष्म झाडाचा आधार घेऊन गतिमान बसला थांबा दिला. बसमधील कुणाच्याही जीवाला धोका झाला नसून चालकाच्या प्रसंगावधानाने सर्व प्रवासी सुरक्षित आहेत. या रोडवर दररोज पहाटेपासूनच १५० जवळील चुलबंद नदीघाटावरून वाळूवहन बैलगाड्या चालतात. परत या राज्य महामार्गाला दोन्ही बाजूला शोल्डर अति कमी असल्याने दोन्ही बाजूंनी चारचाकी क्रॉसिंगवेळी भयानक अपघातचा धोका निर्माण झाला आहे. मागे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून एका कंत्राटदाराने हे काम केले असून रोडाच्या दोन्ही बाजूला शोल्डरच ठेवले नसून जूनेच शोल्डरवर निकृष्ट दर्जाचे कार्य केले असे येथील जनतेचे म्हणने आहे. या राज्य महामार्गाला दोन्ही बाजूला लेन बेड वाढवित कमीत कमी ५ ते ७ फूटाचे शोल्डर ठेवण्यात यावे अशी मागणी जनतेने केली आहे. जेणेकरून रूंद शोल्डरने वळणांवर दिवसा व रात्रीबेरात्री अपघातांच्या प्रमाणावर आळा बसेल.