शिक्षक तुळशीदास पटले महाराष्ट्र राज्य शिक्षक संघ साकोली तालुका अध्यक्षपदी अविरोध निवड

58

शिक्षक तुळशीदास पटले महाराष्ट्र राज्य शिक्षक संघ साकोली तालुका अध्यक्षपदी अविरोध निवड

साकोली / महाराष्ट्र
[ शिक्षण सेवा – नियुक्ती विशेष ]
22. 04. 2023
रिपोर्ट : आशिष चेडगे • उपसंपादक ग्लोबल महाराष्ट्र न्यूज मिडीया

सविस्तर बातमी : साकोली :- महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ साकोलीची मासिक सभा शुक्रवार दिनांक २१ एप्रिलला अनेक विषयाच्या अनुषंगाने झाडे कुणबी समाज सभागृहात पार पडली. सभेला बहुसंख्य शिक्षक उपस्थित होते. प्रसंगी मुबारक सय्यद जिल्हाध्यक्ष ,सुधीर वाघमारे सरचिटणीस, दिलीप बावनकर, मुकेश मेश्राम आदी उपस्थित होते. तालुका संघटनेची पुनर्रचना करणे, अतिरिक्त घरभाडे संदर्भात चर्चा करणे, तालुक्यात नवीन आलेल्या शिक्षकांचे स्वागत करणे. सभेला मान्यवरांनी संबोधित करत संघटनाचे महत्व आपल्या वक्तव्यातून विषद केलेत. संघटनेची धुरा अतिशय खंबीर आणी सदैव शिक्षक हिताचे कामे करत पुढाकाराने नेतृत्व करणारे जि. प. केंद्रीय उच्च प्राथमिक शाळा क्रं. ०१ साकोली येथील सहायक शिक्षक तुळशीदास पटले यांची तालुका संघाच्या अध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली. त्याचप्रमाणे तालुक्यात नवीन प्रवेशीत शिक्षकांचे सुद्धा स्वागत करण्यात आले सभेला स्मिता पात्रिकर,भाष्कर खेडीकर, राकेश चिचामे, विजय वाघाडे, संजीव खंडाईत, सुनील पटले, मनोज ढवळे, शिवकुमार भगत, रवी हटवार, ईश्वर शेंडे, अनिल खंडाईत, दुर्वास निंबेकर, नरेश परशुरामकर, हेमराज भाजीपाले, सुरेश ताराम, लक्ष्मण सयाम, उमाशंकर शर्मा, कृष्णकांत राऊत, काशिनाथ राऊत, विलास करंजेकर, प्रकाश अतकरी, प्रमेश मरसकोल्हे, गोपाल गडपायले, दिलीप सयाम, सुभाष जांभुळकर,रतिराम बडोले, मनोहर चौधरी, रेवेंद्र टेंभरे, राम चाचेरे इत्यादी संघशिलेदार उपस्थित होते. सभेचे संचालन हितेश उईके यांनी तर आभार संघाचे तालुका सरचिटणीस पृथ्वीराज गडपायले यांनी केले. शिक्षक तुळशीदास पटले यांच्या या निवडीबद्दल साकोली तालुक्यातील व शहरातील जिल्हा परिषद प्राथमिक वरीष्ठ आणि कनिष्ठ शाळेतील सर्व शिक्षकवृंदांनी त्यांचे हार्दिक अभिनंदन करून मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.