ट्रकच्या धडकेत महिला घटनास्थळी ठार निर्माणधीन वन्यमार्ग उड्डाणपूल मोहगाटा जंगल महामार्गावरील घटना

149

ट्रकच्या धडकेत महिला घटनास्थळी ठार

निर्माणधीन वन्यमार्ग उड्डाणपूल मोहगाटा जंगल महामार्गावरील घटना

साकोली / महाराष्ट्र
21. 04. 2023
रिपोर्ट • आशिष चेडगे | उपसंपादक ग्लोबल महाराष्ट्र न्यूज मिडीया

सविस्तर बातमी :- साकोली : राष्ट्रीय महामार्ग वन्यक्षेत्र असलेल्या मोहगाटा ते मुंडीपार शिवारात अज्ञात ट्रकच्या धडकेत महिला घटनास्थळी ठार झाल्याची घटना शुक्र. २१ एप्रिलला घडली.
शुक्रवार ( ता.२१.) ला दुपारी ०२ दरम्यान जितेंद्र धर्मराज बन्सोड ४९ पत्नी भद्रशिला जितेंद्र बन्सोड ४० हे दोघेही सावरी जवाहरनगर ता.जि. भंडारा वरून गोंदिया येथे नातेवाईकांचे घरी वास्तुपुजनाला जात होते. मुंडीपार शिवारात निर्माणधीन वन्यमार्ग उड्डाणपूल या एकेरी मार्गावर त्यांच्या होंडा स्प्लैंडर क्र एम एच ३६ ऐडी. ५२३८ ला मागेहून आलेल्या अज्ञात ट्रकच्या धडकेत महिला भद्रशिला जितेंद्र बन्सोड ही खाली पडून घटनास्थळी ठार झाली. घटनेची माहिती मिळताच साकोली पोलीसांनी तात्काळ रूग्णवाहिकेने मृतक शव उपजिल्हा रुग्णालय साकोली येथे शवविच्छेदन करीता पाठविण्यात आले. साकोली पोलीस ठाणे येथे सदर घटनेची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेश थोरात यांच्या मार्गदर्शनात साकोली पोलीस करीत आहेत.