साकोलीत प्रथमच सौंदर्य चिकीत्सा हॉस्पिटलचे उदघाटन संपन्न ; मोफत सौंदर्य शिबीरात ७६ युवती महिलांनी घेतला लाभ

72

साकोलीत प्रथमच सौंदर्य चिकीत्सा हॉस्पिटलचे उदघाटन संपन्न ; मोफत सौंदर्य शिबीरात ७६ युवती महिलांनी घेतला लाभ

जि.प.सभापती मदन रामटेके होते उदघाटन ; शिबिराला महिला युवतींची गर्दी

साकोली / महाराष्ट्र
09.04.2023
रिपोर्ट • आशिष चेडगे संवाददाता ग्लोबल महाराष्ट्र न्यूज

सविस्तर बातमी • साकोली : शहरात पहिल्यांदाच उच्च तंत्रज्ञान कॉम्प्युटराईज्ड सौंदर्य चिकीत्सा हॉस्पिटलचे उदघाटन ( ०९. एप्रिल.) होमगार्ड परेड ग्राऊंडजवळ नविन तहसील रोड येथे संपन्न झाले. शुभारंभीय कार्यक्रमातच मोफत सौंदर्य चिकीत्सा शिबीराचे आयोजन करण्यात आले. येथे एकुण ७६ युवती महिलांनी या त्वचा चेहरा केश सौंदर्य चिकीत्सा शिबीरात आरोग्य लाभ घेतला हे उल्लेखनीय.

 

Read more news 👇👇👇


अखेर ते पिसाळले माकड झाले जेरबंद ; वनविभागाचे शॉर्पशुटर यांची कारवाई


 


पूणे येथून कॉस्मेटोलोजिक्स ट्रिक्लोजिस्टीकमधे बीएएमएस, पीजीडीसीसी उच्च पदवी घेत भंडारा जिल्ह्यातील मूळचे लाखनी तालुका निवासी विलिन मेश्राम व गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जूनीतील आनंदराव सतदेवे यांची नात डॉ. ऐश्वर्या व्ही. मेश्राम हिने जिल्ह्यातील मध्यवर्ती साकोलीत प्रथमच सौंदर्य चिकीत्सा हॉस्पिटल साकारण्याचे स्वप्न बघितले होते व ते तीने साकार करीत सामान्य गोरगरीबांना हि अल्प शुल्कात सौंदर्य आरोग्य सेवा देणे हेच माझे कर्तव्य असल्याचे डॉ. ऐश्वर्या व्ही. मेश्राम हिने प्रतिनिधीला सांगितले. या मोफत सौंदर्य चिकीत्सा शिबीर व आयुस्पर्श स्किन हेअर क्लिनिकचे नविन तहसील रोड होमगार्ड परेड ग्राऊंडजवळ थाटात उदघाटन पार पडले. याप्रसंगी उद्घाटक जिल्हा परिषद सभापती मदन रामटेके, आमदार नाना पटोले यांचे प्रतिनिधी एच.बी. भेंडारकर, आयुर्वेदतज्ञ डॉ. केशव एस. कापगते, लिना मेश्राम, ज्येष्ठ महिला कमलाबाई वैद्य, संगिता सतदेवे, राजेश वासनिक आदी उपस्थित होते. सदर शिबिरात पिंपल्स, पिंपल्सचे डाग, तिळ व मस्से काढणे, वांग, स्किन व्हॉईटनिंग, केस गळणे, टक्कल पडणे, केसांमध्ये कोंडा होणे, केमिकल पिल्स, मिजो थेरेपी, मायक्रो निजलिंग, पीआरपी अश्या विविध सौंदर्य चिकीत्सांवर तपासणी व रोगनिदान उपचार करण्यात आले. यात एकूण ७६ जवळपास महिला युवतींची शिबिरात आरोग्य लाभ घेतला. आपल्या अध्यक्षीय भाषणात सभापती मदन रामटेके यांनी सांगितले की आपल्या जिल्ह्यातील लेक पूणे येथून उच्च सौंदर्य चिकीत्सक शिक्षण घेऊन साकोली सारख्या उपजिल्हा क्षेत्रात गोरगरीबांची सौंदर्य चिकीत्सा सेवा देणे ही शहरासाठी अत्यंत गर्वाची व अभिमानाची बाब असल्याचे प्रतिपादन केले. कार्यक्रमात संचालन नंदकिशोर वैद्य व आशुतोष मेश्राम यांनी तर आभार डॉ. केशव एस. कापगते यांनी केले.