अखेर ते पिसाळले माकड झाले जेरबंद ; वनविभागाचे शॉर्पशुटर यांची कारवाई

71

अखेर ते पिसाळले माकड झाले जेरबंद ; वनविभागाचे शॉर्पशुटर यांची कारवाई

साकोली / महाराष्ट्र
दि. 09/04/2023
रिपोर्ट आशिष चेडगे • संवाददाता ग्लोबल महाराष्ट्र न्यूज

सविस्तर बातमी : साकोली – काही दिवसांपासून माकडांच्या टोळ्यातील एक पिसाळलेल्या माकडांचा धुमाकूळाने शहरातील तलाव वार्डमधील लाखांदूर रोडवरील जनता त्रस्त झाली होती. ०६ एप्रिलला माजी आमदार डॉ. हेमकृष्ण कापगते यांच्यावर सदर माकडाने हल्ला चढविला होता. या माकडांचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी माजी नगरसेवक ॲड. मनिष कापगतेंनी तातडीने वनविभागाला सुचना केली होती. तसे काल ०८ एप्रिलला दु. ०२ वा. साकोलीत नागरिकांना त्रास देणाऱ्या काळतोंडया माकडाला वनविभागाचे जलद बचाव दल भंडारा कॅप्टन विवेक राजूरकर व प. अ. भंडारा यांनी शॉर्पशुटर द्वारे केमिकल डॉर्टशुट मारुन ट्रॅंग्युलॉईज ( सुन्न ) केले. सदर रेसेक्यू ऑपरेशन कार्यवाही निलेश श्रीरामे, एनएनटीआर दल व वनपरिक्षेत्र साकोलीचे
क्षेत्राधिकारी संजय मेंढे वनक्षेत्र सहाय्यक सुनील खांडेकर, वनरक्षक अजय उपाध्ये, वनपाल गुरबेले, वनरक्षक संजय जाधव, वन मजूर राकेश बोरकर, वन मजूर विनोद अवचटे, यांनी घटनास्थळी भेट दिली व गुंगीचे इंजेक्शन औषध मारून माकडांना पकडण्यासाठी बंदोबस्त सुरू होता. हे पिसाळलेले माकड तलाव वार्डमधील बांते यांच्या घराजवळील परिसरात रोजच येत असल्याने नागरिकांनी या माकडाला पिंजरा लावून पकडून जंगलात सोडावे अशी मागणी केली होती. चांगदेव बांते ,भोजराम गहाणे, सारिका रूखमोडे विकास गहाणे, गोपी उईके सुभाष गिरीपुंजे जी.आर.उईके किशोर कापगते पूनम बांते वसंत गोबाडे कृष्णा बांते विजय नागपुरे रामू लांजेवार बाळू निंबेकर अनिल गहाने यांनी या माकडाचा त्वरित बंदोबस्त करावा अथवा आंदोलन करू असा इशाराही दिला होता. अखेर हे पिसाळलेल्या माकडांचा वनविभागाचे अधिकारी, शार्पशुटर, तातडीने सुचना अवगत करणारे स्थानिक माजी नगरसेवक ॲड मनिष कापगते, सामाजिक कार्यकर्ते किरण लांजेवार, गोबाडे, चांगदेव बांते, मुख्याध्यापक भोजराम गहाणे, प्रसारमाध्यम मिडीयाचे मनिषा काशिवार, युवाराष्ट्र दर्शन प्रेस, प्रिंटमिडीयाचे ताराचंद कापगते, साकोली मिडीयाचे आशिष चेडगे यांनी लक्ष वेधून प्रसारण करीत सहकार्य केल्याबद्दल नागरिकांकडून सर्वांचे आभार मानले आहे.