पिसाळल्या माकडांसाठी वनविभागाचे शॉर्प शुटर साकोलीत दाखल

68

पिसाळल्या माकडांसाठी वनविभागाचे शॉर्प शुटर साकोलीत दाखल

दररोज करत होते नागरिकांवर हल्ला

साकोली / महाराष्ट्र
06.04.2023
रिपोर्ट – आशिष चेडगे • संवाददाता ग्लोबल महाराष्ट्र न्यूज

सविस्तर बातमी :- साकोली : तलाव वार्डमधील लाखांदूर रोडवरील नागरी वस्तीत काही दिवसांपासून माकडांच्या टोळ्यातील एक पिसाळलेल्या माकडांनी चांगलाच हैदोस घातला होता. अखेर त्रस्त जनतेनी वनविभागाला पाचारण केले होते. तरीही जनतेस माकडांनी जखमी करण्याचे सत्र सुरू होते. ( बुध.०५.एप्रिल ) सायं. ०३:३० दरम्यान माकडांनी चांगलाच हैदोस घालीत माजी आमदार डॉ. हेमकृष्ण कापगते यांच्या निवासस्थानीच त्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला पण समयसूचकतेने त्यांनी माकडांना पिटाळून लावले. अखेर ०६ एप्रिलला वनविभागाचे शॉर्प शुटर साकोलीतील तलाव वार्डमधील लाखांदूर रोड परिसरात दाखल होत माकडांचा कायमचा बंदोबस्त सुरू होता.

सविस्तर की तलाव वार्ड येथे चांगदेव बांते यांच्या घरी मागे ( ३१ मार्च ) दू. ०२:३० दरम्यान घरांचे बांधकाम सुरू असताना बांधकामावर काम करणारा मजूर कृष्णा मोतीराम नारनवरे वय २१ राहणार खोडशिवनी तह. सडक/अर्जूनी जि. गोंदिया यांच्यावर पिसाळलेल्या माकडाने अचानक हल्ला चढवला प्रसंगावधान राखत चांगदेव बांते यांनी माकडाला हूसकावून लावले त्यामुळे कृष्णा हे माकडाच्या हल्ल्यातून वाचू शकले आहेत, यापूर्वीही २४ मार्चला पिसाळलेल्या माकडाने याच भागामध्ये धुमाकूळ माजवला होता त्यामुळे तीन नागरिकही जखमी झाल्याने उपजिल्हा रुग्णालयात भरती करावे लागले होते. ३१ ला शुक्रवारी याच माकडाने तलाव वार्ड मध्ये त्यांच भागातील सेवानिवृत्त मुख्याध्यापक भोजराम गहाने यांच्या घरी कुटुंबासह बसले असताना त्यांच्या वर अचानक हल्ला चढवण्याचा प्रयत्न केला परंतु गहाणे परिवारातील कुटुंबांनी त्वरित घरात शिरून दार बंद केले परंतु पिसाळलेल्या माकडांनी त्यांच्या बंद दाराला ओरबडल्याने दारावर ओरखडे पडले आहेत. तसेच घरासमोरील पाळणा भिंतीवर आपटल्याने भिंतीवरील टाईल्स फुटलेल्या आहेत त्यामुळे नागरिक प्रचंड दहशतीत आहेत. तलाव वार्डात श्री.बांते यांच्या घराकडे पिसाळलेल्या माकडाने उच्छाद मांडल्याने नागरिक धास्तावले आहेत, काड्या हातात धरून नागरिकांनी माकडाला हुसकावून लावत वनविभागाशी संपर्क साधला अखेर हा पिसाळलेल्या माकडांचा धुमाकूळ बघता माजी नगरसेवक ॲड. मनिष कापगते यांनी वन विभागाला माकडांचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी तातडीने संपर्क साधला अखेर ०६ एप्रिल दू. २:३० ला क्षेत्राधिकारी संजय मेंढे यांच्या मार्गदर्शनात शॉर्प शुटर चमुंसह वनक्षेत्र सहाय्यक सुनील खांडेकर, वनरक्षक अजय उपाध्ये, वनपाल गुरबेले, वनरक्षक संजय जाधव, वन मजूर राकेश बोरकर, वन मजूर विनोद अवचटे, यांनी घटनास्थळी भेट दिली व गुंगीचे इंजेक्शन औषध मारून माकडांना पकडण्यासाठी बंदोबस्त सुरू होता. हे पिसाळलेले माकड तलाव वार्डमधील बांते यांच्या घराजवळील परिसरात रोजच येत असल्याने नागरिकांनी या माकडाला पिंजरा लावून पकडून जंगलात सोडावे अशी मागणी केली होती. चांगदेव बांते ,भोजराम गहाणे, सारिका रूखमोडे विकास गहाणे, गोपी उईके सुभाष गिरीपुंजे जी.आर.उईके किशोर कापगते पूनम बांते वसंत गोबाडे कृष्णा बांते विजय नागपुरे रामू लांजेवार बाळू निंबेकर अनिल गहाने यांनी या माकडाचा त्वरित बंदोबस्त करावा अथवा आंदोलन करू असा इशारा दिला होता.