साकोलीत निघाले अफाट जनसागरात “आम्ही सर्व सावरकर”

37

साकोलीत निघाले अफाट जनसागरात “आम्ही सर्व सावरकर”

अभूतपूर्व शोभायात्रेत लाखांदूरकर – साकोलीकर – लाखनीकरांनी केली तिरंगा भगवामय साकोली •

साकोली / महाराष्ट्र
 दि. 05.04.2023
रिपोर्ट – आशिष चेडगे संवाददाता ग्लोबल महाराष्ट्र न्यूज

सविस्तर बातमी :- साकोली : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर गौरव यात्रा समिती साकोली कडून ( ०४.एप्रिल.) स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेचे आयोजन श्री संत लहरीबाबा मठ देवस्थानातून सेंदुरवाफा ते परत साकोली होमगार्ड परेड मैदानावर अभूतपूर्व शोभायात्रेत लाखांदूरकर, लाखनीकर व साकोलीकर यांच्या अफाट जनसागरात “आम्ही सर्व सावरकर” गौरव यात्रा राष्ट्रीय तिरंगा ध्वजांसह भगवामय साकोली केली हे विशेष. होमगार्ड परेड ग्राऊंडवर मान्यवरांनी स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर यांचे बलाढ्य भारत देशासाठी बलिदान आणि देशासाठी स्वातंत्र्य लढा यावर संभाषण करून वातावरण “आम्ही सर्व सावरकर” असल्याचा प्रत्येक साकोली लाखांदूर व लाखनीकरांनी गर्व अनुभवला हे उल्लेखनीय.

 

Read more news 👇👇👇


कुंभलीत श्री हनुमान मूर्तीची विटंबना करण्याचा प्रयत्न.!


 

श्री संत लहरीबाबा मठ देवस्थान साकोली येथून निघालेल्या भव्य शोभायात्रेत अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराज, झाशीची राणी लक्ष्मीबाई, सेनापती संभाजी राजे, स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर यांना तुरूंगवास प्रतिकृती देखावा, चलचित्र एलसीडी प्रोजेक्टरवर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे इतिहासकालीन दृष्ये, राजाधिराज छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांनी केलेल्या तलवारबाजींचा जिवंत देखावा असे या शोभायात्रेत विशेष आकर्षण ठरले होते. या भव्य शोभायात्रेत मा. आमदार डॉ. परीणय फुके, मा. आमदार राजेश (बाळा) काशिवार, महिला भाजपा आघाडी मोर्चा अध्यक्षा इंद्रायणी कापगते, मा. आमदार डॉ. हेमकृष्ण कापगते, जिल्हा भाजपा अध्यक्ष शिवराम गि-हेपुंजे, भाजपा भंडारा जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश बाळबुध्दे, लाखांदूर ता. भाजपा अध्यक्ष विनोद ठाकरे, लाखनी ता. अध्यक्ष धनंजय घाटबांधे, साकोली ता. भाजपा अध्यक्ष लखन बर्वे यांसह साकोली, लाखांदूर व लाखनी येथील सर्व भाजपा, भाजयुमो, विश्व हिंदू परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बजरंग दल, भाजपा महिला आघाडी मोर्चा सर्व तालुका – शहर अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, महामंत्री, स्वयंसेवक प्रमुख, उपाध्यक्ष आणि ७ ते ८ हजारांवर कार्यकर्ता शोभायात्रेत पदयात्रा आणि दूचाकींसह आलेले होते.

होमगार्ड परेड मैदानावर याचा समारोप करण्यात येऊन देशभक्तीपर गीतांचा ऑर्केस्ट्रा आयोजित करण्यात आला, यावर हातात भव्य जनसागरांनी राष्ट्रीय ध्वज तिरंगा व हिंदू संस्कृतीमय भगवा ध्वज हातात घेऊन अख्खं साकोली शहर तिरंगामय व भगवामय केले. अभूतपूर्व शोभायात्रेत लाखांदूरकर लाखनीकर व साकोलीकर यांनी ” आम्ही सर्व सावरकर आहोत ” अश्या फलकांच्या पाट्या घेऊन शोभायात्रेत शहरवासीयांचे एकच लक्ष वेधून घेतले. आभार नंतर समारोहाची सांगता राष्ट्रगीत आणि वन्दे मातरम् नी करण्यात आली.