संत नरहरी महाराज मंदीर निर्माणकार्यात काहीही कमी पडू देणार नाही ; आमदार नाना पटोले यांचे प्रतिपादन

71
संत नरहरी महाराज मंदीर निर्माणकार्यात काहीही कमी पडू देणार नाही ; आमदार नाना पटोले यांचे प्रतिपादन
 
साकोली येथे पुण्यतिथी सोहळ्याला मंदिराचेही भुमिपुजन संपन्न • महाप्रसादात भक्तभाविकांचा जनसागर
 
साकोली / महाराष्ट्र 
दि. 08 फेब्रुवारी 2023
रिपोर्ट : आशिष चेडगे • संवाददाता ग्लोबल महाराष्ट्र न्यूज
 
सविस्तर बातमी साकोली : सुवर्णकार समाजाचे आराध्य दैवत संत श्री नरहरी महाराज यांच्या साकोली शहरातील शारदा चौकातील या मंदीराचे निर्माणकार्याला कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होऊ देणार नाही तर या कार्याला तन मन धनाने सहकार्य करून त्यासाठी लागेल तो निधी उपलब्ध होणारच असे प्रतिपादन महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व आमदार नाना पटोले यांनी ( ०८.फेब्रु.) ला संत श्री नरहरी महाराज पुण्यतिथी सोहळ्याला आपल्या भाषणात केले. येथे मंदीराचा भुमिपुजनही आ.पटोले यांच्या हस्ते झाले.
और खबर पढ़ें 👇👇👇


      संत श्री नरहरी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त शारदा चौकातील श्री नरहरी महाराज मंदीर देवस्थानात हा सोहळ्याला प्रमुख उपस्थितीत आमदार नाना पटोले, ब्लॉसम इंग्लिश स्कुल प्राचार्य अश्र्विन नशिने, इंजि. संदीप बावनकुळे, चंद्रकांत वडीकार, प्रतिभा पारधी, जितेंद्र नशिने, ईश्वरदास सोनवाने, राजू पालीवाल, आनंद नागोसे, गजेंद्र लाडे, व अन्य मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी मंदीर देवस्थानाचा भुमिपुजन सोहळा आ. नाना पटोले यांच्या हस्ते करण्यात आला. येथे सोनार समाजातील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचा, ज्येष्ठ नागरिक, सेवानिवृत्ती मान्यवरांचाही सत्कार समारंभ पार पडला. प्रास्ताविकात अध्यक्ष महेश पोगळे यांनी सांगितले की समाजातील एकोपा कायम ठेवण्यासाठी समाज बांधवांनी एकत्र येऊन मंदीर निर्माणकार्यात सरसावले पाहिजे. संत नरहरी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त दोन दिवसीय महोत्सवात सोनार समाज बांधव साकोली – सेंदूरवाफा समिती अध्यक्ष महेश पोगळे, उपाध्यक्ष निलेश मस्के, मयूर गजापुरे, कोषाध्यक्ष दिनेश गजापुरे, व्यवस्थापक शेखर गजापुरे, रेवाराम गजापुरे, कार्याध्यक्ष प्रेमलाल गजापूरे, उत्तम गजापूरे, पुजा समिती लेखराम हर्षे, खुशाल रोकडे, सचिव अनिल डोमळे, दिनेश पोगळे, सहसचिव विजय गजापूरे, विलास गजापूरे, सदस्यगण कुसोबा गजापुरे, सुनिल बांगरे, मधूकर डुंभरे तर ज्येष्ठ मार्गदर्शक मुरलीधर गजापूरे गुरूजी, उध्दव भजने, सुरेश गजापूरे, रामकृष्ण गजापुरे, अशोक हाडगे, चंद्रहास्य भुजाडे, दिलीप निनावे, दिलीप गजापुरे आणि सर्व सोनार समाज बांधव, संत श्री नरहरी महाराज मंदीर देवस्थान समितीचे सदस्यगणांनी सोहळा यशस्वी होण्यासाठी अथक परिश्रम घेतले.