साकोलीत जिल्हा परिषद हायस्कुल वाचवायला सरसावले पालक.

105

साकोलीत जिल्हा परिषद हायस्कुल वाचवायला सरसावले पालक

तासिका शिक्षकांचे वेतनच नाही ; मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून घेतला पवित्रा 

साकोली/महाराष्ट्र
दि. 08 फरवरी 2023
रिपोर्ट:- आशिष चेडगे • संवाददाता ग्लोबल महाराष्ट्र न्यूज

सविस्तर बातमी साकोली : शहरातील मुख्य जिल्हा परिषद हायस्कूल येथे एकुण ७ ते ८ सहाय्यक शिक्षकांचे पद रिक्त असून सध्या शिक्षणात खंड पडू नये करीता ०९ घड्याळी तासिका शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली. पण गेल्या काही महिन्यांपासून प्रशासनाने सदर तासिका शिक्षकांचे मानधनच दिले नाही अश्यात या शिक्षकांचा हिरमोड होऊन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये व सध्या तीन महिने सत्र परीक्षांचे असल्याने यासाठी आता पालकांनीच या तासिका शिक्षकांचे मानधनची जबाबदारी उचलली आहे.

और न्यूज पढ़ें 👇👇👇


वीडियो गेम पार्लर पर कार्रवाई करें पत्रकार संघ की मांग.!


अवैध रेती उत्खनन प्रकरणी वाहने व साहित्य जप्त, घटना स्थल पोकलेन व पाणीची बोट जप्त.!


जिल्हा परिषद हायस्कूल साकोली येथे १२ तुकडी ५ ते १० वर्गातील एकुण पटसंख्या ५४८ आहे. सध्या येथे ६ + १ सात शिक्षक एक मुख्याध्यापक असे कार्यरत असून अजूनही ८ सहाय्यक शिक्षकांचे पद रिक्त आहे. या गंभीर प्रकाराने ५४८ विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अभ्यासक्रमात खंड पडत आहे ही भयंकर स्थिती बघता येथील शाळा पालक समिती व शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मागे येथे ०९ तासिका शिक्षकांची नियुक्ती केली होती. पण जिल्हा परिषद प्रशासनाने यांचे मानधनच अद्याप दिले नाही. अश्याने हे शिक्षक नाराजीने असतात व याच मनस्थितीत शिक्षण अभ्यासक्रमाकडे दूर्लक्ष होत आहे. या गंभीर प्रकाराने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अभ्यासक्रमात खंड पडत असून आता तर तीन महिने शिष्यवृत्ती परीक्षा, जवाहर नवोदय विद्यालय परीक्षा आणि द्वितीय अंतीम परीक्षा तोंडावर आली असताना पालकच या तासिका शिक्षकांची मानधन देण्याकरीता सरसावले आहेत. नुकतीच पालक समिती व शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन प्रति पालक १०० रू, जिल्हा परिषद शिक्षक १००० रू असे जमा करून हे परीक्षांचे ३ महिने पर्यंत यांच्या वेतनाची रक्कम जबाबदारी सांभाळली आहे. यात जिल्हा परिषद हायस्कूल शिक्षकांचे अमुल्य सहकार्य असून समितीचे व प्राचार्य डि.एल.कोचे, माता पालक समितीचे पुष्पा कापगते, हरीश लांजेवार, चंद्रकांता वडीकार, बि.आर. चव्हाण आणि सर्व माता पालक समिती, शाळा व्यवस्थापन समिती व परीसरातील दक्ष सामाजिक कार्यकर्त्यांनी या शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक अभ्यासक्रमाचे नुकसान थांबविण्यासाठी मदतकार्यात अखेर सरसावले आहेत हे विशेष.