साकोलीत मालकी वहिवाट जागेवर रातोरात अतिक्रमण.!

93

साकोलीत मालकी वहिवाट जागेवर रातोरात अतिक्रमण.!साकोली/महाराष्ट्र
दि. 05 फरवरी 2023
ग्लोबल महाराष्ट्र न्यूज •
रिपोर्ट:- संवाददाता साकोली 

सविस्तर बातमी  साकोली : साकोली शहरातील नागझिरा वन्यजीव अभयारण्य मुख्य रोडवर आता मालकी हक्क जागेवरच चक्क पक्के बांधकाम करून अतिक्रमणे करण्याचा धक्कादायक प्रकार नुकताच समोर आला. येथे काहींनी शासकीय जागा धरून सुक्ष्म ठेलाच जागेसह हक्क दाखवित विकण्याचाही माहिती काल ( ०४.फेब्रु.) नागरीकांनी सांगितली. याबाबद साकोली पोलीस या जागेवर चौकशीसाठी मागे आली असून येथील जागा मालकांनी मालकी हक्क वहिवाटीतील जागेत अवैध अतिक्रमणे नगरपरीषद व सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी दखल घेत तातडीने हे अतिक्रमण तोडण्याची मागणी केली आहे.

और न्यूज पढ़ें 👇👇👇


वीडियो गेम पार्लर पर कार्रवाई करें पत्रकार संघ की मांग.!


अवैध सुगंधित तंबाकू तस्कर को घुग्घुस पुलिस ने धरा.


हेमराज पांडुरंग कुरसुंगे रा. साकोली यांची सन १९५० पासून कटकवार हायस्कूलच्या रोडवरील दक्षिण दिशेला ( १९६६ चे म.ज.म. अधिनियम कलम ५१ ) प्रमाणे शेतजमीन जागा गट क्र. ३०२, ३०३ न.भू.क्र. ११९/१ शिट क्र.५ – ४८९५१.०० चौ.मी. १२.७ आर. या जागेतील समोर अद्यावत वहिवाट असून गुरूवार ०२ फेब्रुवारीला येथे रात्रीतून रोड कडेलाच भरणा टाकीत अतिक्रमण करीत सिमेंटचे बांधकाम सुरू केले. याबाबद जागा मालकांना नागरिकांनी सांगितले असता घटनास्थळी शेतजमीन मालक कुरसुंगे यांनी तहसीलदार साकोली यांचे पत्र क्र. महसुल.सहा./प्रस्तुत-१/कावि/४७/ ११/०१/२०२३ नुसार मालकी हक्क दर्ज करण्याचा आदेश व फेरफार संमतीचे पत्र दाखवित अतिक्रमण हटविण्याची मागणी केली आहे. या रोडवर याच बाजूला काहींनी शासकीय जागेवर टिनशेड ठेला मांडून काही दिवसांनी तो ठेला व जागा परस्पर विकण्याचाही संतापजनक प्रकार साकोलीत सुरू आहे. याबाबत काही नागरिकांनी पोलीस ठाणे साकोली येथे तक्रार दाखल केली आणि मागे सदर जागेवर चौकशीसाठी पोलीसही येऊन पाहणी करीत प्रकरणाची नोंद केली. हा नागझिरा अभयारण्य पर्यटन मुख्य रोड असून येथे शाळा महाविद्यालय जास्त आहेत. दररोज येथून शाळकरी मुले ये जा करतात आणि असे चक्क रोडवरच अतिक्रमणे थाटल्याने वाहतूक विस्कळित होऊन विद्यार्थ्यांसोबत व नागरिकांसोबत भयंकर अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. यातच महाविद्यालय परिसरात काही हॉटेलांतून दारू पिण्याचे मिनी बार बनलेले असून या मुख्य महाविद्यालय परिसरातील महिला विद्यार्थीनींसोबत केव्हाही अनुचित प्रकार घडू शकतात. याकडे नगरपरीषद प्रशासनाने तातडीने दखल घेण्याची मागणी येथील रहिवासी जनतेने केली आहे.