कलकामच्या संचालकावर दाखल केलेले गुन्हे भरत गुप्ता व प्रतिमा ठाकूर यांचेवर सुद्धा दाखल करा.

100

कलकामच्या संचालकावर दाखल केलेले गुन्हे भरत गुप्ता व प्रतिमा ठाकूर यांचेवर सुद्धा दाखल करा.

 

कलकाम रिअल इन्फ्रा (इं) लि. या कंपनीच्या गुंतवणूकदारांची पोलीस अधीक्षकांकडे मागणी.

चंद्रपुर/महाराष्ट्र दि: २६ जुन २०२१

चंद्रपूर प्रतिनिधी :-

सविस्तर बातमी:- कलकाम रिअल इंफ्रा (इं) लि. कंपनीचे गुंतवणुकदार यांनी सन २०१३ पासुन कंपनी मध्ये रु.१ लाखापासून तर रु.१०-१० लाखापर्यंत गुंतवणूक केली असून ठरलेल्या मुदतीत गुंतवणूकदारांना मुद्दलसह व्याजाची रक्कम देण्यास मागील सन 2017 पासून कंपनीचे संचालक व अधिकारी टाळाटाळ करीत होते. यामागे गुंड प्रवृत्तीचे भरत गुप्ता व प्रतिमा ठाकूर हे त्या कंपनीच्या संचालकांचे व अधिकाऱ्यांचे संरक्षण करीत होते त्यामुळेच कंपनीच्या गुंतवणूकदारांना त्यांच्या ठेवीची मुद्दत भरल्यानंन्तर सुद्धा पैसे परत मिळू शकले नाही त्यामुळे या दोघांवार सुद्धा पोलिसांनी गुन्हे दाखल करावे अशी मागणी घेऊन कलकाम कंपनीचे गुंतवणूकदार यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार देऊन स्थानिक प्रेस क्लब येथे पत्रकार परिषदेत मागणी केली आहे.

आम्हांला वेळीवेळी धमक्या देऊन कंपनीच्या कार्यालयातून हाकलून दिले..!
  • कलाकाम कंपनीच्या गुंतवणूकदारांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे की कंपनीचे कंपनीच्या संचालक व अधिकाऱ्यांना पैसे मागण्यासाठी कुठलाही गुंतवणूकदार कंपनीच्या कार्यालयात गेला तर हे गुंड प्रवृत्तीचे भरत गुप्ता व प्रतिमा ठाकूर हे आम्हांला मारण्याच्या धमक्या देत होते आणि जवळपास सन 2017 पासून यांनी आम्हा गुंतवणूकदारांना कंपनीच्या संचालकाकडून पैसे मिळू नये म्हणूंन आम्हांला वेळीवेळी धमक्या देऊन कंपनीच्या कार्यालयातून हाकलून दिले त्यामुळे आजपर्यंत आम्हांला कंपनी कडून पैसे मिळाले नाही. आता आम्ही जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केलेल्या तक्रारीवरून कपंनीच्या संचालक व अधिकाऱ्यावर एमपीआयडी कायाद्याअंतर्गत गुन्हे दाखल झाले असून विदेश रामटेके याला अटक झाली आहे तर मग त्याला संरक्षण देणाऱ्या भरत गुप्ता व प्रतिमा ठाकूर यांच्यावर गुन्हे का दाखल करण्यात आले नाही असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

अधिक विडियो देखिए 👇👇👇

 


 

भीती दाखवून कंपनीच्या संचालकांना ब्लॅकमेल करण्यासाठी ते काम करत होते..
  • भरत गुप्ता व प्रतिमा ठाकूर यांचा कलाकाम या कंपनीशी कुठलाही संबंध नसताना व त्यांच्याकडे न्याय मिळवून द्या म्हणून कुठलाही एजंट किंव्हा गुंतवणूकदार गेला नसताना ते स्वतःहून कंपनीच्या संचालकांकडून पैसे मिळविण्यासाठी व आम्हची भीती दाखवून कंपनीच्या संचालकांना ब्लॅकमेल करण्यासाठी ते काम करत होते मात्र त्यांच्या या भ्रष्ट भूमिकेमुळे आम्हा गुंतवणूकदाररांचा पैसा कंपनीच्या संचालकाकडून मिळू शकला नाही त्यामुळे भरत गुप्ता व प्रतिमा ठाकूर हे दोन्ही दोषी असल्याने त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी त्यांनी मागणी केली.

 

विदेश रामटेके व विजय येरगूडे यांना संरक्षण देऊन आम्हा गुंतवणूकदारांना धमकावले होते.!
  • ते पुढे म्हणाले की भरत गुप्ता व प्रतिमा ठाकूर यांनी गडचांदूर परिसरात घेतलेल्या कंपनीच्या गुंतवणूकदार व एजंट च्या बैठकीत विदेश रामटेके व विजय येरगूडे यांना संरक्षण देऊन आम्हा गुंतवणूकदारांना धमकावले होते त्याचा व्हिडीओ आम्हच्या जवळ असून कंपनीचे मुख्य संचालक विष्णू दळवी यांच्यासोबत भरत गुप्ता यांचे बोलणे झाले याची ऑडिओ सुद्धा आम्हच्याकडे आहे व कंपनीचे संचालक तुमचे पैसे देणार आहे याची हमी सुद्धा त्यांनी दिली होती. दरम्यान गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळाले नसल्याने गुंतवणूकदारांनी पोलिसात तक्रार देऊन पत्रकार परिषद घेतली होती त्या विरोधात ह्याच विदेश रामटेके यांना घेऊन भरत गुप्ता व प्रतिमा ठाकूर यांनी पत्रकारपरिषद घेऊन आम्ही दिलेली तक्रार चुकीची आहे, कंपनी कडून गुंतवणूकदारांना पैसे देणे सुरु आहे असे म्हटले होते, त्यामुळे भरत गुप्ता व प्रतिमा ठाकूर हे कंपनीच्या संचालक अधिकारी यांच्यासोबत असल्याचे सिद्ध होत आहे व त्यांच्यामुळेच आम्हा गुंतवणूकदारांना आजपर्यंत पैसे परत मिळाले नाही मात्र यांनी कंपनीच्या संचालकाकडून लाखो रुपये घेऊन स्वार्थ साधला आहे त्यामुळे हे दोघे तेवढेच दोषी असल्याने त्यांच्यावर सुद्धा गुन्हे दाखल करावे अशी मागणी रत्नमाला स. चहारे,मंगला सुनिल लोणारे व इतर उपास्थित कलकाम गुंतवणूकदार यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे केली आहे.