इंदिरा क्रिडा मंडळ परिसरातील नागरिकांची पिण्याच्या पाण्याची मागणी पूर्ण – माजी नगरसेविका सौ सुवर्णा अरुण भटारकर

58

इंदिरा क्रिडा मंडळ परिसरातील नागरिकांची पिण्याच्या पाण्याची मागणी पूर्ण – माजी नगरसेविका सौ सुवर्णा अरुण भटारकर

चंद्रपुर/महाराष्ट्र

दि. 22 जुन 2022

 सविस्तर फातमी:-  शिवाजी वार्ड बल्लारपूर येथील इंदिरा क्रिडा मंडळ परिसरातील नागरिकांची मागील काही काळापासून पिण्याच्या पाण्याची समस्या होती.याकरिता शिवाजी वार्डची- माजी नगरसेविका सौ. सुवर्णा अरुण भटारकर* यांनी सबंधित विषयावर *मा.श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार *माजी अर्थ व नियोजन मंत्री महाराष्ट्र राज्य तथा *मा.श्री चंदनसिंह चंदेल माजी अध्यक्ष वनविकास महामंडळ महाराष्ट्र राज्य* तथा *माजी न. प.अध्यक्ष मा. श्री हरीश शर्मा* यांच्याकडे पाठपुरावा करून या समस्येला मार्गी लावले आहे.आमदार निधी अंतर्गत खनिज विकास निधी तुन निधी मंजूर करुन ट्युबवेल चे खोद काम करुन त्याला वार्डातील अनेक ठिक‌ ठिकाणी नळाची सोय करण्यात आली.

इंदिरा क्रिडा मंडळ परिसरातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची समस्या पुर्ण झाल्यामुळे त्या‌ परिसरातील नागरिक *माजी नगरसेवीका सौ. सुवर्णा अरुण भटारकर यांचे मनःपूर्वक आभार ‌मानले.