वृक्षारोपण करून युवकाचा वाढदिवस साजरा..!

75

वृक्षारोपण करून युवकाचा वाढदिवस साजरा..!

शंकरपुर ग्रामवासीयांचा अभिनव उपक्रम..!

साकोली/भंडारा
दि. 28 मे 2022

सविस्तर फातमी :- संत तुकाराम महाराजांनी वृक्षांचे महत्व सांगताना अतिशय सुंदर असा अभंग मांडला आहे तो म्हणजे असा की,

वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे
पक्षीही सुस्वरे। आळविती।।
येणे सुख रुचे एकांताचा वास।
नाही गुणदोष। अंगी येत।।

   वृक्ष खूप महत्त्वाची भूमिका बजावतात, आपल्या पर्यावरणाचे संतुलन ठेवण्यासाठी आणि पर्यावरणाला प्रदूषणापासून वाचण्यासाठी झाडे महत्त्वाची भूमिका बजावतात.
आपण जर वृक्षरोपण केले वृक्षांचे योग्य पालनपोषण केले तर त्यांच्यापासून आपल्याला विविध गोष्टी प्राप्त होतात. ज्या भागांमध्ये वृक्षाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते त्या भागातील परिसर हा स्वच्छ आणि निसर्गमय पाहायला मिळतो.
असचं प्रकरण तालुक्यातील मौजा शंकरपुर/वडेगाव येथे पाहायला मिळाले, रोहित रमेश सोनवाने (१६) या युवकाचा वाढदिवस सोहळा २५ मे रोजी पार पडला; मात्र विशेषतः म्हणजे ग्रामवासीयांची कामगिरी..!
“वाढदिवस हे केवळ आतिशबाजी किंवा पार्टीचं देऊन न साजरा करता, एखादे सोयीस्कर असे सामाजिक उपक्रम राबवून सुद्धा वाढदिवस साजरा करता येतो” असा मोलाचा संदेश सिद्ध करत ग्रामवासीयांनी वृक्षारोपण करून रोहित ला त्याची “जन्मदिवस भेट” दिली.
वरील वृक्षारोपण प्रसंगी, संजीव मडावी, क्रिष्णा मडावी, रोशन कोचे, उमेश सोनवाने, मंगेश सयाम, सचिन सोनवाने, राकेश सयाम व दिशांत कोचे आणि शुभम टेकाम तसेच समस्त ग्रामवासी उपस्थित होते.