सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर राहणारे, मोहम्मद इरफान शेख यांची चंद्रपूर शहर (जिल्हा) कांग्रेस कमेटीच्या महासचिव पदी नियुक्ती करण्यात आली आहे

116

 

चन्द्रपुर/महाराष्ट्र
दि. 01 अगस्त 2021

चंद्रपूर – सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर राहणारे उत्कृष्ट वक्ते .
मागील अनेक वर्षांपासून सामाजिक व राजकीय जीवनात नेहमी संघर्ष हा इरफान शेख यांच्या आयुष्यातील महत्वाचा भाग राहिलेला आहे.
नुकतेच त्यांनी कांग्रेस पक्षात प्रवेश करीत आपल्या वक्तव्य कौशल्याने सर्वांची मने जिंकली.
त्यांच्या कार्याची दखल घेत शहर अध्यक्ष रामू तिवारी यांनी इरफान शेख यांचा शहर कार्यकारणी मध्ये समावेश केला.
नुकताच खासदार धानोरकर यांच्या हस्ते इरफान शेख यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.
मोहम्मद इरफान शेख यांच्या पुढील राजकीय वाटचालीसाठी खासदार धानोरकर, आमदार प्रतिभा धानोरकर, कांग्रेस कमेटी जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, शहर अध्यक्ष रामू तिवारी यांनी शुभेच्छा दिल्या आहे.