माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुण्यतिथी दिनी” निराधार महिलेला मिळाला घराचा आधार ”राजूरेड्डी यांची वचनपूर्ती “

256

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुण्यतिथी दिनी” निराधार महिलेला मिळाला घराचा आधार ”राजूरेड्डी यांची वचनपूर्ती “

चंद्रपुर/महाराष्ट्र

दि. 22 में 2021

घुग्घुस :आयुष्याच्या उतारवयात घरा सोबत जगण्याची उमेद ही हरली मात्र काही होतकरू युवक पुढे आली त्यांनी खाण्या – पिण्याची व्यवस्था केली

उद्धवस्त झालेले घर आता होणार नाही उर्वरित आयुष्य रस्त्यावरच कळावे लागले या काळजीने हवालदिल झालेल्या माऊलीच्या मददतीला एक “बडा दिलवाला” धावून आला व पडक्या झोपडी ऐवजी पक्का घर बनवून दिला

 

येथील अमराई वॉर्ड नंबर एक मधील बेघर पट्टीत राहणाऱ्या 68 वर्षीय भागरथा बाई सिडाम यांचे कच्या स्वरूपाचे घर हे विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे घरातील साहित्या सह जळून खाक झाले होते.

 

ही जागा नजुलची असल्याने भागरथा बाई यांना कुठल्याही प्रकारे शासकीय मदद मिळाले नाही त्यामुळे उतारवयात या माऊलीला बेघर होण्याची वेळ आली या माऊलीची परिस्थिती लक्षात घेऊन घुग्घुस काँग्रेस अध्यक्ष राजूरेड्डी यांनी त्यांना पक्के घर बांधून देण्याचा शब्द दिला होता.

 

आपल्या वचनाची पूर्तता करीत दोन खोल्याचा पक्का घर रेड्डी यांनी भागरथा सिडाम यांना बांधून दिले व देशाचे माजी पंतप्रधान स्व. राजीव जी गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त हे घर भागरथा बाई यांच्या स्वाधीन करण्यात आले.

याप्रसंगी कामगार नेते सैय्यद अनवर, समाजसेवी दीपक पेंदोर, बालकिशन कुळसंगे, रोशन दंतलवार व मित्र परिवार उपस्थित होते.