भद्रावती शहरात आग लागून दोन दुकाने भस्मसात

209

भद्रावती शहरात आग लागून दोन दुकाने भस्मसात

अंदाजे साडेसहा लाखांचे नुकसान

चंद्रपुर/महाराष्ट्र

दि. १३ अप्रैल २०२१

भद्रावती : शहरातील मुख्य बाजारपेठे आज मंगळवार दिनांक 13 ला पहाटे तीन ते चार वाजताच्या दरम्यान लागलेल्या आगीत दोन दुकाने भस्मसात होऊन जवळपास साडेसहा लक्ष रुपयांचे नुकसान झाल्याची घटना घडली आहे. पहाटे सहा वाजता अग्निशामक दलाची गाडी घटनास्थळी पोहोचली. मात्र तोपर्यंत उपस्थित नागरिकांनी आग विझवली होती. या आगीत संजय बेलगांवकर यांच्या वसंत आयुर्वेदिक मेडिकल स्टोअर्स ला आग लागून दुकानातील सर्व मालासह ,दस्तऐवज, दुकान परवाना जळून खाक झाला. यात त्यांचे जवळपास तीन लाख रुपयांचे नुकसान झाले. तर बाजूलाच असलेल्या मंगेश संजय सहारे यांच्या सहारे पूजा साहित्य भंडार ला आग लागून दुकानातील सर्व माल जळून खाक झाला. त्यात त्यांचे जवळपास अडीच लक्ष रुपयाचे नुकसान झाले. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.


कोयला आपुर्ती के साथ कोयला चोरीपर भी अंकुश लगाने की मांग करे सुधीरभाऊ !