“साहेब त्याच पक्षात आहेत काय?” काँग्रेस कार्यकर्त्यांना अस्थिर करणारी व्हायरल पोस्ट!

46

“साहेब त्याच पक्षात आहेत काय?”

काँग्रेस कार्यकर्त्यांना अस्थिर करणारी व्हायरल पोस्ट!

चंद्रपूर/महाराष्ट्र

दि. 06  एप्रिल 2024
रिपोर्ट :- अनुप यादव , ग्लोबल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

सविस्तर बातमी :- सध्या सोशल मीडियाचा पूर्ण वापर निवडणुकीच्या कार्यात होत आहे. उमेदवारांच्या न केलेल्या कार्याचा ही मोठ्या गाजावाजात खोटा प्रचार करून उमेदवारांचा गुणगाण करण्याचा प्रकार लढतीत असलेल्या कांग्रेस उमेदवार प्रतिभा धानोरकर यांच्याकडून होत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे मतदारांमध्ये निराशेचे व अनास.थेचे वातावरण निर्माण झालेले दिसत आहे. याच खोट्या प्रचाराला वैतागून “ताईला मतदान करा, तुम्हाला बाळूभाऊ च्या *त्यागाची* शपथ आहे.” सारखी पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली होती, “वास्तवता कथन करणाऱ्या” त्या पोस्टने कांग्रेस गोटांमध्ये चांगलीं खळबळ माजली. ते होत नाही तर कुणबी समाजाची राजुरा येथील सभा रद्द, धनोजे कुणबी dkpl चे आयोजन करणारे राजकुमार डाखरे यांचेवरील हिंसक हल्ला आता आर्णी तालुक्यातील बारभाई या गावात महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांचे प्रचाराचे वाहन वरिष्ठ कांग्रेसी नेत्यांच्या व उमेदवारांच्या सांगण्यावरून संतोष जाधव यांनी परतवून लावले ते काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत, कांग्रेसी नेत्यांची अशी गुंडागर्दी खपवून घेणार नाही असे आवाहन आम. धुर्वे यांनी केले आहे. प्रचाराची रणधुमाळी ला आत्ता सूरूवात झाली असून काँग्रेसचे मैदानी कार्य करणारे कार्यकर्ते वरिष्ठांच्या अश्या वागणुकीमुळे वैतागले आहेत. नेत्यांच्या शब्दावर व त्यांचा विश्वास राहिलेला नसल्याचे कांग्रेस गोटात चित्र आहे. त्याचं जिल्ह्यातील कोणता ना कोणता नेता भाजप मध्ये प्रवेश करीत आहे. उद्या कोण कुठे जाईल याची खूले आम रंजक चर्चा दारूची दुकाने, पानटपरी सारख्या ठिकाणी ऐकायला मिळत आहे. “सोनु तुझा माझ्यावर भरोसा नाही का?” फेमसारखे कांग्रेसी नेते “*भाऊ* त्याच पक्षात आहे गा दादा!” असे म्हणण्याची वेळ कांग्रेस पक्ष पदाधिकाऱ्यांवर आली आहे. त्यातचं सोशल माध्यमांवर सध्या “कार्यकर्त्यांना विनंती ! दररोज प्रचाराला सुरूवात करण्यापूर्वी *साहेब, त्याच पक्षात आहेत काय?* यांची दर तासाला अपडेट घेत जा!” अशी खोडसार फिरणारी पोस्ट ची धास्ती मात्र कांग्रेसी पदाधिकाऱ्यांनी जास्त घेतली आहे. चला आपण ही ही विचारू, “साहेब, आज मंचावर तर दिसत आहे तनाने…!” पण खरचं “साहेब, त्याचं पक्षात आहेत काय?”