सट्टा हाफिज चा… ! यवतमाळ पोलिस backfoot वर…!

120

सट्टा हाफिज चा… !

यवतमाळ पोलिस backfoot वर…!

 

यवतमाळ (विशेष प्रति.)

 

सविस्तर बातमी:- दोन जिल्ह्यांना जोडणारा एक पुलिया…! या कडेला चंद्रपूर तर दुसऱ्या कडेला यवतमाळ जिल्हा…! चंद्रपूर जिल्ह्यातून पुलिया पार केल्यानंतर लगेच यवतमाळ जिल्हा लागता क्षणीचं डाव्या हातावर एक लहानसी झोपडी नजरेत पडते. या झोपडी समोर दुचाकी, चारचाकी यांची वर्दळ नेहमीचीच..! या झोपडी मध्ये करोडोचा गैरकारभार चालत असेल असं कुणीही अंदाज बांधू शकत नाही. नवेगाव जवळ असलेल्या या झोपडी सारख्या घरामध्ये मोठ्या स्तरावर सट्टा बाजार चालतो. हा सट्टा बाजार वणी येथे राहणाऱ्या ” जन्नत” मध्ये राहणारे हाफिजभाई यांचा असल्याचे सांगण्यात येते. अत्यंत लहान दिसणाऱ्या या झोपडीमध्ये करोडो रुपयांचा सट्टा बाजार चालविला जातो परंतु यावर यवतमाळ पोलीस किंवा कोणत्याही विभागाने अद्याप कारवाई केली नाही व करणारही नाही असे जाणकार सांगतात, त्याचे कारणही तसेच आहे. हाफिजभाई यांचे सट्टा, कोंबडं बाजार , जुगार चालविणारे अपराधी “हाफिज ” हे नांव फार अदबीने घेतात. एका अर्थी या सर्व गैरकारावर “हाफिज ” याचा वरदहस्त आहे. यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा सह विदर्भातील अनेक जिल्ह्यांत हाफिजभाई यांचे बंदेचं हे व्यवसाय सांभाळतात, हाफिज च्या सहमती/परवानगीशिवाय (NOC) शिवाय विदर्भात असले धंदे कोणाचं करू शकत नाही, असे बोलले जाते. “जन्नत” मध्ये राहणारे हाफिजभाई विदर्भाला “जहन्नुम” करण्यात व्यस्त आहेत, परंतू त्याचे कोणतेही सोयरसुतक संबंधित यंत्रणांना नाही. यांचे जिवंत उदाहरण म्हणजे यवतमाळ जिल्ह्याच्या सिरपूर या पोलिस ठाण्याअ़तर्गत येणारा हा सट्ट्यांचा अड्डा-ठिय्या -मुख्यालय आहे. अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या ठिय्यावर-मुख्यालयावर आजपावेतो कोणतीही धाड पडलेली नाही. यातुन हाफिजभाई यांचे वजन लक्षात येते. दोन जिल्ह्याच्या सीमेवरील हा सट्ट्याचा अड्डा शब्बीर चालवितो, यापूर्वी शब्बीर घउग्घउस मध्ये हाच कारभार स्वतंत्र करायचा. परंतु हाफिज च्या संरक्षणाशिवाय यात जम बसवता येणार नाही, हे लक्षात आल्यावर शब्बीर हाफिज ला शरण गेला. आता शब्बीर सीमेवरील कारभार सांभाळतो, हे याच व्यवसात असलेले सांगतात. शब्बीर च्या मते जुगार कायद्याअंतर्गत कारवाई होते. त्याच दिवशी जामीन मिळतो. सगळेच बांधून असल्यामुळे कोणाच्याही केसाला धक्का लागत नाही. प्रत्येक जिल्ह्यात असे कितीतरी कार्यकर्ते हाफिजभाई पाशी आहेत. “हमारा कोई बाल भी बाका नहीं कर सकता” असे शब्बीर ठासून सांगतो. यावरून हाफिज व त्यांच्या ताकदीचा अंदाज येतो व यवतमाळ पोलिसांची कर्तव्यदक्ष तेचा अंदाज लावलेला बरा… ! कोणीतरी या हाफिजभाई च्या धंद्याच्या व त्यांच्या मुसक्या आवळल्या पाहिजे.