घुग्गुस शहरातील वाहतूक कोंडी व नागरीकांची होणारी गैरसोय

92
घुग्गुस शहरातील वाहतूक कोंडी व नागरीकांची होणारी गैरसोय
टाळण्यासाठी अवजड वाहनांना प्रतिबंध
 
चंद्रपुर/महाराष्ट्र
दि. 22 डिसेंबर 2023
रिपोर्ट : जिला प्रतिनिधि रमाकांत यादव ग्लोबल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
 
सविस्तर बातमी :- चंद्रपूर दि. 21 :घुग्गूस शहरातील रेल्वे ब्रिजचे काम चालू असून शहरातून जाणाऱ्या जड वाहनांमुळे वाहतूक समस्या निर्माण होत आहे. वाहतूक समस्येवर आळा घालण्यासाठी घुग्गूस शहरात जड वाहनांना वाहतूक बंदी व पर्यायी मार्गाचा अवलंब करण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून नागरीकांना आवाहन करण्यात येत आहे.
मुंबई पोलिस अधिनियम 1951 च्या कलम 33 (1)(ब) नुसार सार्वजनिक ठिकाणी व रस्त्यावर रहदारीचे करावयाच्या नियमानासाठी प्राप्त असलेल्या कायदेशीर अधिकारान्वये, घुग्गूस शहरातून जाणाऱ्या जड वाहनांच्या वाहतुकीमुळे वाहतूक समस्या निर्माण होऊन रहदारीला अडथळा निर्माण होऊ नये, जनतेस त्रास होऊ नये, त्यांची गैरसोय होऊ नये व अपघातासारखे प्रकार घडून जीवित किंवा वित्तहानी होऊ नये तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी उपाययोजना करण्यात येत आहे.
घुग्गूस शहरातील रेल्वे ब्रिजचे काम सुरू असल्याने कोणत्याही प्रकारची बाधा निर्माण होणार नाही व वाहतुकीचे नियमन व्हावे, तसेच कोणत्याही प्रकारचा अपघात होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये, याकरीता दि. 30 नोव्हेंबर 2023 पर्यंत सर्व प्रकारच्या जड वाहनांना वाहतुकीस बंद करण्याची परवानगी देण्यात आली होती. सदर कालावधीत अद्यापही रेल्वे ब्रिजचे बांधकाम पूर्ण न झाल्याने महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कार्पोरेशन लिमिटेड कंपनीचे पत्र प्राप्त झाल्याने सदर अधिसूचनेमध्ये दि. 30 जून 2024 पर्यंत मुदतवाढ करण्यात येत आहे. त्यामुळे 30 जून 2024 पर्यंत सकाळी 4 ते रात्री 12 वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या जड वाहनांना वाहतुकीस बंद करण्यात येत आहे. रात्री 12 ते 4 वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या जड वाहनांना प्रवेश राहील, तरी जड वाहतूकदारांनी बंद कालावधीदरम्यान पर्यायी मार्गांचा अवलंब करावा.दिलेल्या निर्देशाचे पालन करुन प्रशासनास सहकार्य करावे.
शहरात जड वाहनांना वाहतूक बंदी
सकाळी 4 ते रात्री 12 वाजेपर्यंत घुग्गूस बसस्थानक ते म्हातारदेवीपर्यंत जड वाहतुकीस बंद राहील. तसेच घुग्गूस बसस्थानक ते राजीव रतन हॉस्पिटल-बेलोरा ओवर ब्रिजमार्गे वणीकडे जाणारा रस्ता जड वाहतुकीस बंद राहील.
असे असेल पर्यायी मार्ग
सकाळी 4 ते रात्री 12 वाजेपर्यंत वणीकडून, घुग्गूसकडे येणारी जड वाहतूक राजीव रतन हॉस्पिटलपर्यंत येऊ शकेल. वणीकडून घुग्गूस बसस्थानकाकडे जाण्यासाठी पाटाळा-कोंडा फाटा किंवा पाटाळा-वरोरा-भद्रावती-ताडाली-पडोली घुग्गूस या मार्गाचा अवलंब करावा. तसेच घुग्गूसकडून वणी जाण्याकरीता पडोली-भद्रावती-वरोरा मार्गांचा अवलंब करावा.