साकोली नगरपरिषद उठली बालकांच्या जीवावर..!

48

🛑 साकोली नगरपरिषद उठली बालकांच्या जीवावर

📕 गणेश प्रभागात करून गेली जीवघेणे काम • लहान मुलांना धोका •

◾ साकोली / महाराष्ट्र
Tue. 13. 07. 2023
आशिष चेडगे : ग्लोबल महाराष्ट्र न्यूज

🔳 सविस्तर बातमी | साकोली : गणेश वार्ड साकोली येथे एका जुन्या विहिरीला बुजवण्याच्या नादात साकोली नगरपरिषद लहान मुलांच्या जीवावर उठली आहे. सदर प्रकरणातून नगर परिषदेने उरफाटा मामला करून ठेवलाय. परिणामी विहिरीच्या शेजारी राहणाऱ्या मुलांसाठी जीवितहानीचा धोका तयार झाला आहे. नगर परिषदेच्या या उरफाटा धोरणामुळे गणेश वार्डात संतापची लाट पसरली आहे.

🔳 प्रकरण असे की, साकोली येथे गणेश वार्डात तलाव बायपास शेजारी एक जुनी विहीर आहे. जवळपास ३०० फूट खोल असलेल्या या विहिरीचे पाणी वापरणे लोकांनी बंद केले. त्यामुळे ही विहीर बुजवण्याचा निर्णय घेण्यात आला. पावसाळ्याचे दिवस असल्याने ही विहीर तुडुंब भरलेली आहे. ही विहीर बुजवण्याच्या नादात नगर परिषदेने एक ०६ जुलैला या विहिरीचे संरक्षित (तोंडी) कठडे तोडले. यात पाच सहा ट्रॅक्टर कचरा टाकला. विटा, माती, दगड अशा प्रकारचा मलबा टाकला असता तर एक वेळ समजण्यासारखे होते. कारण हे साहित्य तळाखाली गेले असते आणि पाणी वरून निघून गेले असते. परंतु नगर परिषदेने कचरा टाकल्याने हा कचरा पाण्याच्या वर आला. आणि पाणी खाली गेले. कचरा टाकण्याच्या नादात विहिरीची तोंडी तोडल्याने लहान मुलांच्या जीवितला धोका निर्माण झाला आहे. या विहिरीच्या शेजारी घरी आहेत. आसपास मुले खेळतात. या विहिरीचे कठडे कचरा टाकण्यासाठी तोडून टाकल्याने ही विहीर धोकादायक ठरली आहे. दोन-तीन दिवसात ही विहीर बुजवण्याचे सांगून नगर परिषदेने आता हात झटकले. आज १० दिवस होउनही या विहिरीकडे नगरपरिषद लक्ष द्यायला तयार नाही. एकीकडे विहिरीचे संरक्षित कठडे तोडले, दुसरीकडे विहीर बुजवण्याचे नाव नाही. लहान मुलांच्या व जनतेच्या जीवावर उठलेल्या नगरपरिषदेचा उत्तम नमुना सध्या तरी साकोली बघावयास मिळत असून नगरपरिषद विरोधात गणेश वार्डातील जनतेचा संताप व्यक्त होत आहे.
[ 🚫 ⚠️ : Do not Copy this Global Maharashtra News ]