नवविवाहितेवर सासरमंडळींचा अत्याचार • वधू व आईची पोलीसात तक्रार

84

🛑 नवविवाहितेवर सासरमंडळींचा अत्याचार ; पोलीसांत वधू – आईची तक्रार

🔳 हुंड्यासाठी पत्नीला छळण्याचा वधूच्या आईचा आरोप • साकोलीतील घटना

◾ साकोली / महाराष्ट्र
Wed. 12. 07. 2023
रिपोर्ट : आशिष चेडगे • उपसंपादक ग्लोबल महाराष्ट्र न्यूज

📕 सविस्तर बातमी : साकोली : नुकतेच जानेवारी २०२३ ला विवाहित झालेल्या २३ वर्षीय पत्नीला सासरीमंडळींकडून हुंड्यासाठी छळण्याचा आरोप लावित मुलीच्या जीवाला केव्हाही धोका निर्माण झाला आहे. याबाबद मुलीच्या आईने सासरमंडळींविरोधात ( ११ जुलै ) ला पोलीस ठाणे साकोली येथे लेखी तक्रार दाखल केली. तर नवविवाहितेने सुद्धा यापूर्वीही ०१ जून २०२३ ला पोलीसांत तक्रार दाखल केली असून कलम भादवि १८६० अन्वये ३२३, ५०४, ५०६ नुसार गुन्हा दाखल झाला आहे.

📕 दिपीका ( परीवर्तित नाव ) मु.पो. विठ्ठल रखुमाई मंदिर समोर सिव्हिल वार्ड साकोली हिचे लग्न जानेवारी २०२३ ला झाले. वारंवार मुलीला हुंड्यासाठी त्रास देऊन मारहाण करणे असा छळ केला जात असल्याचे तीची आई साबरा बी. शेख मु.पो. अमलाई, ता. सुहगपूर ( बुढार ) जि. शहडोल ( मध्यप्रदेश ) हिला माहिती होताच याबाबद दि. ११ जुलै २०२३ ला साकोली पोलीस ठाणे येथे लेखी तक्रार दाखल केली. यात माझ्या मुलीला माहेरून पैशे आणण्यासाठी शारीरिक व मानसिक त्रास देतात, दहेज न आणल्यास जीवेनिशी मारण्याची धमकी दिली जात आहे. यात माझ्या मुलीला केव्हाही जीवितहानी होऊ शकते याची चौकशी करून माझ्या मुलीला संरक्षण देण्यासाठी सबब तक्रार दाखल केली आहे. यापूर्वीही नवविवाहित दिपीका ( परीवर्तित नाव ) हिने साकोली पोलीस ठाणे येथे मागे ०१ जूनला पती नाजिम अब्दुल रहिम शेख २६, सासरे अब्दुल रहिम शेख ५५, सासू आयशा अब्दूल शेख ५० सर्व रा. सिव्हिल वार्ड साकोली विरोधात गैरअर्जदारांनी “मैने तुझे तलाक दिया हैं अब तू मेरे घर में रहने का नही” असे बोलून मारहाण करीत जीवे मारण्याची धमकी देत तीला व तीच्या आईला घराबाहेर काढले. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. पण वारंवार हुंड्यासाठी छळण्याचा प्रकार होत असून सासरमंडळींकडून नवविवाहितेवर सतत अन्याय होत आहे. तिच्या जीवाला भयंकर धोका निर्माण झाला असून गैरअर्जदारांनी आमची तक्रार केल्यास मला व माझ्या मुलीला जिवेनिशी मारण्याची धमकीही दिली आहे. असे या तक्रारीत नमूद असून याची चौकशी करून मला व माझ्या मुलीला न्याय द्यावा अशी मुलीची आई साबरा हिने मागणी केली आहे.