बेरोजगारांना रोजगार देण्यासाठी पिंडकेपार येथे भारतीय आयुर्विमा अभिकर्ता शिबिर

87

📕 बेरोजगार युवकांना रोजगार देण्यासाठी पिंडकेपार येथे शिबिर

📕 भारतीय आयुर्विमा योजनेचा लाभ घ्यावा पुजा कुरंजेकर यांचे आवाहन

◾ साकोली / महाराष्ट्र
Tue. 13. 07. 2023
रिपोर्ट : आशिष चेडगे • उपसंपादक GM NEWS

🔳 सविस्तर बातमी | साकोली : भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या साकोली शाखा अंतर्गत जीवन विमा अभिकर्ता भरती सुरु आहे. याची सुरूवात साकोली शाखेतील (सी. एल. आय.ए.) पुजा नरेश कुरंजेकर यांनी केली आहे. दि. १३ जुलैला स. ८ वा. साकोली तालुक्यात पिंडकेपार येथे मुख्य चौकात बेरोजगार युवकांना रोजगार देण्यासाठी भारतीय आयुर्विमा महामंडळातर्फे साकोली शाखेतील पुजा नरेश कुरंजेकर यांच्या तर्फे अभिकर्ता भरतीचे शिबिर लावण्यात आले. याचा मुख्य उद्देश बेरोजगार युवकांना रोजगार देणे हा आहे.

🔳 भारतीय आयुर्विमा महामंडळातर्फे साकोली शाखेतील पुजा नरेश कुरंजेकर यांच्या जीवन विमा अभिकर्ता भरती मोहीम मध्ये बेरोजगार युवकांनी योग्य प्रतिसाद दिला आहे. पुजा नरेश कुरंजेकर यांनी बेरोजगार युवकांना अभिकर्ता भरती विषयी योग्य ते मार्गदर्शन केले व त्यांना विमा क्षेत्रात अभिकर्ता म्हणून काम करण्यासाठी आग्रह करीत ग्रामीण भागातील प्रत्येक गोरगरीबांना विमेचा लाभ द्यावा व त्यांच्या पाल्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या विविध विमा योजनांचा लाभ घेण्यासाठी आवाहनही त्यांनी केले आहे.