• साकोलीत जिमनेशियम स्टूडियोचे उदघाटन

40

🛑 साकोलीत जिमनेशियम फिटनेस स्टूडियोचे उदघाटन

सामाजिक कार्यकर्ता सपन कापगते यांचे शरीरयष्टी व्यायामासोबत आधुनिक जिमतून अभिनव प्रयत्न •

◾ साकोली / महाराष्ट्र
Mon. 10. 07. 2023
रिपोर्ट : आशिष चेडगे उपसंपादक ग्लोबल महाराष्ट्र न्यूज

🔳 सविस्तर बातमी || साकोली : वाढत्या मुलांपासून तर सर्व महिला पुरुषांना सुदृढ आणि निरोगी राहण्यासाठी शरीरयष्टी अत्यंत गरजेचे झाले आहे. करीता येथील युवा सामाजिक कार्यकर्ता सपन शरद कापगते या युवकाने नविन तंत्रज्ञान आणि मशिनरी स्थापित करून सर्वांना या आधुनिक व्यायाम शाळा ( जिमनेशियम फिटनेस स्टूडियो ) च्या माध्यमातून कसरत, योगा, प्राणायाम आणि सोबतच शरीरयष्टी फिट राहण्यासाठी जिम स्टूडियोचा शुभारंभ सोहळा ( ०९ जुलै ) ला नंदलाल पाटील कापगते महाविद्यालय परिसरात पार पडला.
🔳 याप्रसंगी उदघाटक माजी आमदार राजेश (बाळा) काशिवार, स्मार्ट व्हिलेज डेव्हलपमेंट सोसायटी संस्थापक प्रकाश बाळबुद्धे, अरविंद देशमुख, शरद कापगते, डॉ. दुर्वास कापगते, संजय कापगते, ॲड. मनिष कापगते, एजाज खान, सदु खान, फहिम शेख़, कविता देखमुख, छगन कापगते, डॉ. मोहिनी हांडेकर, बंडू शेंडे, ॲड. सतीश कापगते, वैजयंती कापगते, डॉ. नरेश कापगते, दामोधर कापगते, प्रा.अरुण झिंगरे, प्रशांत डोमळे, कुणाल देशमुख सोबत अन्य मान्यवर उपस्थित होते.
सदर आधुनिक जिमनेशियम फिटनेस स्टूडियोत शरीरयष्टी व्यायामासोबतच योगा प्राणायाम क्लासेसही अवतरण केलेले आहे. व्यायाम शाळेत महिलांसाठी वेगळे झोनल आणि पुरूष मुलांसाठी वेगळ्या झोनल असून येथे प्रशिक्षित योगा प्राणायाम शिक्षक हे योगासनांचे धडे देत आहेत. साकोली तालुक्यात प्रथमच अश्या आधुनिक जिमनेशियम फिटनेस स्टूडियो – व्यायाम शाळेचे लोकार्पण झाले असून शालेय विद्यार्थ्यांसह महिला पुरुषही सुदृढ निरोगी आरोग्यासाठी या व्यायाम शाळेत नोंदणी करीत आहेत हे विशेष.