• साकोलीत नेत्र आरोग्य शिबिरात २०५ रूग्णांनी घेतला लाभ

34

🛑 साकोलीत नेत्र आरोग्य शिबिरात २०५ रुग्णांनी घेतला लाभ

🔳 मोतियाबिंदू ऑपरेशनसाठी ९० नेत्र रूग्णांची निवड ; ४५ जणांना चष्मे वाटप

🛑 स्व. नंदलाल पाटील कापगते जन्मशताब्दी आणि डॉ. हेमकृष्ण कापगते यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन

◾ साकोली / महाराष्ट्र
Mon. 10. 07. 2023
रिपोर्ट : आशिष चेडगे उपसंपादक ग्लोबल महाराष्ट्र न्यूज

🔳 सविस्तर बातमी || साकोली : स्व. नंदलाल पाटील कापगते यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आणि माजी आमदार डॉ. हेमकृष्ण कापगते यांच्या वाढदिवसानिमित्त सोम. ( १० जुलै ) श्याम सुश्रृषा रूग्णालय गणेश वार्ड साकोली येथे नेत्र आरोग्य शिबिरात एकुण २०५ नेत्र रूग्णांनी डोळ्यांची तपासणी करीत या शिबिराचा लाभ घेतला. तर ९० नेत्र रूग्णांची मोतिबिंदू शस्त्रक्रियेसाठी निवड होत ४५ जणांना चष्मे वाटप करण्यात आले.
🔳 श्याम बहुउद्देशीय शिक्षण संस्था, श्यामरावबापू कापगते स्मृती प्रतिष्ठान, डॉ. हेडगेवार सेवा समिती, महात्मे नेत्र पेढी नागपूर, जिल्हा अंधत्व नियंत्रण समिती, इंडीयन मेडीकल असोसिएशन, जिजामाता पतसंस्था साकोली, विमुक्त भटके समाज संस्था भंडारा, राज्य परिवहन महामंडळ साकोली यांच्या संयुक्त विद्यमाने या नेत्र आरोग्य शिबिरात उपस्थित माजी आमदार डॉ. परीणय फुके, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश बाळबुध्दे, भाजपा नेते डॉ. गजानन डोंगरवार, आदर्श महिला सरपंचा कुंदाताई डोंगरवार, ह.भ.प. डोमाजी कापगते, अरूण बडोले, मनोहर कापगते, प्रा. गिता बोरकर, विजया शेंडे, कल्पना गहाणे, प्रदीप मासुरकर, माजी न.प.उपाध्यक्ष जगन उईके, माजी नगरसेवक हेमंत भारद्वाज, ॲड. मनिष कापगते, भाजपा शहराध्यक्ष किशोर पोगळे, पत्रकार डि.जी. रंगारी, आशिष काशिवार, अनिल जगिया, श्रावण कापगते, प्राचार्य अमोल हलमारे, मनोहर चौधरी, रामकृष्ण बोरकर, प्रा. सुनिल कापगते, प्रा.धनंजय तुमसरे आणि असंख्य पदाधिकारी हजर होते. मान्यवरांनी स्व. नंदलाल पाटील कापगते व स्व. शामरावबापू कापगते यांच्या प्रतिमेचे पूजन तथा दिप प्रज्वलन करून सदर नेत्र आरोग्य शिबिराचे उदघाटन केले. शिबिरात साकोलीसह ग्रामीण भागातील तब्बल २०५ नेत्र आणि इतर रूग्णांनी येथे आरोग्य लाभ घेतला. येथे महात्मे नेत्र पेढी नागपूरचे डॉ. अनु कुमारी, डॉ. अरविंद डोंगरवार व त्यांच्या चमुने आरोग्य सेवा प्रदान केली. शिबिरात माजी आमदार डॉ. हेमकृष्ण कापगते यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या चाहत्यांनी रूग्णालयात येत पुष्पगुच्छ देऊन त्यांचेवर शुभेच्छांचा वर्षाव केला. सदर आरोग्य शिबिराचे आयोजन माजी नगरसेवक ॲड. मनिष कापगते व मित्र परिवारांनी केले होते. शिबिर यशस्वी करण्यासाठी विवेक कापगते, आशिष चेडगे, बलराज नंदेश्वर, मोरेश्वर गहाणे, युवराज गहाणे, आशिष सेलोकर, राजू कापगते, मधूकर नगरकर, सारंग कापगते, मिन्नाथ लांजेवार, अनिल नागपुरे, भागवत लांजेवार, सुमन शेंडे, अमित डुंभरे, रवि भोंगाणे, आशिष कापगते, गणेश सुर्यवंशी, विनायक तिडके, आदित्य चेडगे, कॅमेरामन शुभम खांडेकर यांनी अथक परिश्रम केले.