• साकोलीत एसबीआयच्या जनरेटरला अचानक आग..मोठा धोका टळला

58

🛑 साकोली भारतीय स्टेट बँकेच्या जनरेटरला आग ; मोठी जिवीतहानी टळली

🛑 पोलीस व नगरपरिषद अग्नीशामक दलाची तातडीची समयसूचकतेने धोका टळला

साकोली / महाराष्ट्र
17. 05. 2023
रिपोर्ट • आशिष चेडगे • उपसंपादक ग्लोबल महाराष्ट्र न्यूज

सविस्तर बातमी – साकोली : शहरातील सिव्हिल प्रभागात असलेल्या भारतीय स्टेट बँक कृषी विकास शाखेच्या मोठ्या जनरेटरला आज अचानक आग लागली हि घटना आज १७ मे च्या सायं ४:१५ ला घडली. त्यातच बॅंक अधिकारी, पोलीस प्रशासन, महावितरण व नगरपरिषद अग्निशामक दलाची समयसूचकता ठेऊन घटनास्थळी तातडीने धाव घेत परीस्थिती हाताळून या रहिवासी परीसरातील सुदैवाने होणारा धोका टळला आहे.
सविस्तर की सिव्हिल वार्ड क्रं. ०८ पोलीस ठाणे मागील भारतीय स्टेट बँक कृषी विकास शाखेच्या बाहेर ठेवलेल्या व सुरु असलेल्या विद्युत पुरवठा जनरेटरला अचानक आग लागली. बाहेरुन आगींचे आगडोंब उसळताच येथील शाखा प्रबंधक अमित फिसके यांनी पोलीस ठाणे येथे तात्काळ फोनवर माहिती देताच तातडीने पोलीस दल नगरपरिषद अग्निशामक दलासह घटनास्थळी पोहोचले व आगीवर नियंत्रण मिळविले. पोलीस निरीक्षक राजेशकूमार थोरात यांनी महावितरणला याची माहिती दिली महावितरण कर्मचाऱ्यांनी तातडीने विद्युत तारांवरील पुरवठा तात्पुरता खंडीत केला आणि बॅंकेतून येणाऱ्या जाणाऱ्या विद्युतवहन तारांना बाजूला करीत समयसूचकतेने होणाऱ्या संकटावर नियंत्रण मिळविले. कारण या भारतीय स्टेट बँकेच्या परीसरात नागरीक वस्ती, हॉस्पिटल असून वेळीच प्रशासनाने अतितातडीची दखल घेऊन या आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश प्राप्त केले. यावेळी साकोली पोलीस उपनिरीक्षक संजय खोकले व चमु, नगरपरिषदेतील अग्निशामक दलाचे आनंद रंगारी, प्रकाश गेडाम, सचिन डोमळे, भारतीय स्टेट बँकेचे कर्मचारी आणि महावितरणचे सर्व कर्मचारीही सदर कार्यात स्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून होते.