• महामाया ग्रुप व डि.जी. रंगारी यांच्यातील वाद सामंजस्याने सुटला

47

📕 महामाया ग्रुप व डि. जी. रंगारी यांच्यातील वाद अखेर सामंजस्याने सुटला

📕 साकोली येथील विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत दिली माहिती

साकोली / महाराष्ट्र
15. 05. 2023
रिपोर्ट – आशिष चेडगे • उपसंपादक ग्लोबल महाराष्ट्र न्यूज

सविस्तर बातमी :- साकोली : मागे शहरात ५ मे रोजी बुद्ध पौर्णिमेला महामाया ग्रुप तर्फे प्रबोधनात्मक कव्वालीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता व त्या ठिकाणी एशियन न्यूज चॅनलचा कॅमेरा लावण्यासंदर्भात पत्रकार डि. जी. रंगारी आणि महामाया ग्रुप यांच्यात काही तुरळक वाद उत्पन्न झाला होता. यातच दूस-या दिवशी त्यांनी आपल्या वृत्तपत्रात महामाया ग्रुपच्या विरोधात “पत्रकारांसोबत अरेरावी” बातमी प्रकाशित केली होती. व दोन्ही बाजूंनी वादंग निर्माण झाले होते. यातच महामाया समूहचे सदस्यांनी त्याच दिवशी पत्रकार परिषद घेऊन त्यांचेवर आरोप प्रत्यारोप केल्याने सामाजिक वातावरण बिघडण्याचे संकेत दिसत होते. पण आज दि. १५ मे २०२३ ला दोघांनीही सामाजिक द्वेष न ठेवता पत्रपरिषद घेत महामाया ग्रुप व एशियन न्यूज चॅनलचे डि. जी. रंगारी यांनी एकत्र बसून सविस्तर चर्चा करण्यात आली. आणि सामाजिक प्रश्न सोडविण्यासाठी दोघांनीही पुढाकार घेतला व आता यांच्यात कोणत्याच प्रकारची उजर तक्रार राहिली नसून समाजप्रबोधन कार्यक्रमासाठी एकमेकांना सहकार्य करीत सामाजिक एकोपा जोपासण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहनही डि. जी. रंगारी व महामाया ग्रुपने केले आहे. सदर पत्रकार परिषदेत डि. जी. रंगारी, धम्मा वासनिक, योगेश बडोले, शुभम राऊत, दिपक साखरे, हरिभाऊ शहारे, अनिकेत कान्हेकर, यादोराव गणविर, अश्विन रंगारी, चिराग जनबंधू आदी उपस्थित होते.