साकोलीत इमारतीवरून पडून एका कामगाराचा जागीच मृत्यू

108

साकोलीत इमारतीवरून पडून एका कामगाराचा जागीच मृत्यू

मोदी कॉम्प्लेक्स महामार्गावरील घटना ; पोलीसांत घटनेची नोंद • कुटुंबीयांनी केली मालकांकडून मदतीची मागणी

साकोली / महाराष्ट्र
28. 04. 2023
रिपोर्ट / आशिष चेडगे • उपसंपादक ग्लोबल महाराष्ट्र न्यूज मिडीया

सविस्तर बातमी • साकोली :- शहरातील मे.मोदी पेट्रोल पंप बाजूलाच काम सुरू असलेल्या मोदी कॉम्प्लेक्स या इमारतीवरून वेल्डर कामगार पडून जागीच मृत्यू झाल्याची घटना आज शुक्र. ( ता. २८.) एप्रिलला स. ११ ला घडली.

Read more news 👇👇👇


अन्यथा नगरपरिषदेवर काढू घागर गुंडी मोर्चा ; वैशाली झनक लांजेवार यांचा इशारा.


सविस्तर की मोदी पेट्रोल पंप लगत बांधकाम सुरू असलेल्या मोदी कॉम्प्लेक्स या इमारतीच्या चौथ्या माळ्यावर वेल्डिंगचे काम सुरू होते. आज शुक्रवार दि. २८ एप्रिलला शैलेश रामकृष्ण कटकवार वय ३२ वर्षे रा. सौंदड हा इमारतीच्या चौथ्या माळ्यावरून वेल्डिंगचे काम बांधलेल्या शिडीवरून करीत असता खाली पडल्याने शैलेशचा जागीच मृत्यू झाला. दिनेश रामनिवास मोदी यांचे सौंदड येथील शोरूममध्ये शैलेश कटकवार हा काम करायचा पण ७ दिवसांपासून साकोली येथील मोदी कॉम्प्लेक्समध्ये मृतक शैलेश वेल्डिंगचे कामावर नेमले होता. शुक्रवार २८ एप्रिलला स. ११ दरम्यान काम सुरू असताना अचानक बांधलेल्या चैली शिडीवरून त्याचा तोल सुटला आणि चौथ्या माळ्यावरून सरळ खाली पडला. कामावर असलेले कामगार धावत येऊन शैलेशला उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात नेले असता डोक्याला गंभीर इजा झाल्याने शैलेशला वैद्यकीयांनी तपासणीअंती मृत घोषित केले. मृतकाचे शवविच्छेदन करण्यात आले व साकोली पोलीसांत घटनेची नोंद करण्यात आली असून पोलीस निरीक्षक राजेश थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. शैलेश कटकवार रा. सौंदड हा सामान्यतः कुटूंबातील मुलगा असून सौंदड येथे कामावर असता त्याला साकोलीत कामावर आणले असे त्यांच्या कुटुंबियांनी सांगितले असून शैलेश कटकवार याची महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळात कामगार नोंदणी असून त्याच्या कुटुंबियांना समंधित कामावरील मालकांकडून मदतकार्य मिळण्याची मागणी शैलेशचे आलेल्या कुटुंबातील सदस्यांनी उपजिल्हा रुग्णालयात बोलतांनी ही मागणी केली आहे.