साकोली न्यायालय टि पॉईंट चौकात आता थांबणार जलद बस

62

साकोली न्यायालय टि पॉईंट चौकात आता थांबणार जलद बस

साई मंदिर समितीच्या प्रयत्नाला आले यश

साकोली / महाराष्ट्र
दि. 26. 04. 2023
रिपोर्ट – आशिष चेडगे / उपसंपादक ग्लोबल महाराष्ट्र न्यूज

सविस्तर बातमी : साकोली : साकोली येथील लाखांदूर रोड टि पॉईंट या साकोली न्यायालय चौकात नागपूर भंडारा कडून येणाऱ्या जलद व साधारण बसेस सहजासहजी थांबत नव्हत्या याने चंद्रपूर, वडसा, लाखांदूर, अर्जूनी/मोर, नवेगावबांध कडील प्रवाशांना समोर तहसिल थांबा व थेट बसस्थानक येथून परत काही ना काही साधनाने परत या चौकापर्यंत यावे लागत होते. हा त्रास लक्षात घेता येथील साई मंदिर समिती सचिव अनिल मुरकुटे यांनी याबाबद दि. ०१ एप्रिल २०२३ ला विभागीय नियंत्रक रा.प.म. भंडारा यांना निवेदन दिले. तसे या सर्व स्वाक्षऱ्यांसह पत्राची दखल घेत विभागीय नियंत्रक यांनी साकोली आगार येथे दि. २५/०४/२०२३ ला पत्र आदेश देत सदर लाखांदूर रोड टि पॉईंटवर सर्व जलद व साधारण बसेस थांबवून प्रवासी चढ उतार करण्यासाठी पत्राद्वारे सुचना देण्यात आलेत.
आता साकोली न्यायालय चौकात अंडरपास बोगद्याजवळ रितसर बस थांब्याचे पत्र प्राप्त झाले असून कुणी जर बस थांबवली नाही तर सदर पत्र दाखविणे किंवा बस क्रमांक वेळ दिनांक लिहून त्याबाबद तक्रारही केल्यास सदर चालक वाहकावर कारवाई करण्यात येईल. अनेक वर्षापासून या मागणीचा पाठपुरावा केला होता परंतु तो शक्य नाही असे अधिकारी यांनी त्यासंबंधी सांगितले पण साई मंदिर समिती सचिव अनिल मुरकूटे यांनी राज्य परीवहन विभागीय नियंत्रक भंडारा अधिकारी यांना भेटून निवेदन देण्यात आले आणि हे थांबा करून घेतले. कारण नागपूरहून येणारी बस लाखांदूर रोड चौक बोगदा येथे थांबा नसल्याने आम्ही बस थांबवु शकत नाही असे चालक म्हणत होते साकोली डेपो ला सुद्धा लेखी देण्यात आले पण त्यांनी सुद्धा लक्ष दिले नाही त्यामुळे भंडारा मुख्य कार्यालयाला निवेदन देऊन हे काम करावे लागले. आता चंद्रपूर, वडसा, लाखांदूर ला जाणारे प्रवाशी आणि गुप्ता कालोनी, साई नगर कालोनी, न्यायालयातील नागरीक यांना आता या बस थांब्यामुळे फार सोयीचे झाले आहे. सदर बस थांबा मिळाल्याबद्दल साई मंदिर समिती सचिव अनिल मुरकुटे व सहका-यांचे डॉ. राजेश चंदवानी, डॉ. दिपक चंदवाणी, ॲड. मनिष कापगते, हेमंत भारद्वाज, अखिलेश गुप्ता, नितीन बावनकर, दुर्गेश चव्हाण, समरीत गुरूजी, हर्षे सर,
सुधाकर गोबाडे, शिक्षक गजापुरे, भावेश लांजेवार, मनिष शहारे, कार्तिक लांजेवार, अनिल बावणकर, शिक्षक गायधने, धकाते, सांगोडे, पिंटु गडेकर यांनी अभिनंदन केले आहे.