श्रीराम नवमीच्या पावन पर्वावर श्रीराम हिंदू युवा मंच करणार भव्य श्रीराम जन्मोत्सव सोहळा साजरा

70

श्रीराम नवमीच्या पावन पर्वावर श्रीराम हिंदू युवा मंच करणार भव्य श्रीराम जन्मोत्सव सोहळा साजरा

साकोली / महाराष्ट्र
दि. 29.03.2023
रिपोर्ट – आशिष चेडगे संवाददाता ग्लोबल महाराष्ट्र न्यूज

सविस्तर बातमी: साकोली : शहरातील प्रत्येक धार्मिक आणि सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असलेली श्रीराम हिंदू युवा मंच यंदाही ( ३०.मार्च.) ला श्रीराम नवमी जन्मोत्सव सोहळा आयोजित करणार आहेत. यात दू. ३ वाजता प्रभु श्रीराम मुर्तींची प्राणप्रतिष्ठा पुजन, भव्य महाप्रसाद सायंकाळी ५ पासून, आणि विशेष म्हणजे श्रीराम नवमी शोभायात्रेतील सर्व भक्तभाविकांसाठी शरबत वितरण करण्यात येणार आहे. सदर सर्व आयोजन लाखांदूर चौक साकोली येथे असून या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अध्यक्ष तथा क्षेत्रातील आमदार नाना पटोले हे आवर्जून उपस्थित राहणार आहेत. सदर श्रीराम जन्मोत्सव सोहळा निमित्त विशेष हिंदू संस्कृतीमय डिजे वाद्यांवर आयोजन असून जास्तीत जास्त भक्तभाविकांनी या जल्लोषमय सोहळ्याला उपस्थित रहाण्याचे विनंती आवाहन श्रीराम हिंदू युवा मंच साकोली यांनी केलेले आहे.