चेटीचंड महोत्सव ; साकोली शहरात निघाली सिंधी समाज बांधवांची भव्य बाईक रॅली

71

चेटीचंड महोत्सव ; साकोली शहरात निघाली सिंधी समाज बांधवांची भव्य बाईक रॅली

आज होणार दिवसभर विविध कार्यक्रम

साकोली / महाराष्ट्र
23.03.2023
रिपोर्ट : आशिष चेडगे संवाददाता ग्लोबल महाराष्ट्र न्यूज

सविस्तर बातमी • साकोली : सिंधी समाजाचे इष्ट दैवत संत श्री झुलेलाल जयंती निमित्त साकोली शहरातील सिंधू भवन येथे समाजबांधवांनी विधीवत पूजा अर्चना करून भव्य मोटारसायकल रॅली शहरात काढण्यात आली. आज २३ मार्चला विविध कार्यक्रम संपन्न होणार असून सर्व आयोजन पुज्य सिंधी पंचायत मंडळ व नवयुवक सिंधी सेवा समाज मंडळांनी याचे जल्लोषात आणि आनंदात ही साजरी करतील.
स. ९:३० ला सदर मोटरसायकल रॅली ही लाखांदूर रोड सिंधू भवन येथून पोलीस ठाणे मार्ग – तुमसर – एकोडी रोड चौक – नगरपरिषद चौक – नागझिरा चौक – बसस्थानक चौक – प्रगती कॉलनी चौक – सेंदूरवाफा साई राईसमिल चौक – पॉलिटेक्निक कॉलेज चौक – एसबीआय चौक – जूने पंचायत समिती – न्यायालय मार्ग परत सिंधू भवन येथे समापन करण्यात आली. येथे महामार्गावरील संपूर्ण वाहतूक व्यवस्था साकोली वाहतूक पोलीस नायक अश्विन भोयर व त्यांच्या होमगार्ड टिमने सुव्यवस्थेत सांभाळली होती. दुपारी सिंधू भवन येथे भव्य महाप्रसादाचे आयोजन, बस स्थानक, एकोडी रोड चौक व लाखांदूर रोड चौक येथे शरबत वितरण आयोजन तसेच सायं. पूजा अर्चना पल्लव आरती आणि भव्य शोभायात्रेचे व ज्योती विसर्जनाचे आयोजनही विशेष आकर्षण आहे. सर्व आयोजन पुज्य सिंधी पंचायत, सिंधी नवयुवक सेवा मंडळ व सिंधी समाजातील पुरुष महिला पदाधिकारी व सदस्य अथक परिश्रम घेत आहेत. संपूर्ण कार्यक्रमात छायाचित्रण प्रसारण सेवा साकोली मिडीया नेटवर्क करीत आहे.