२१० मिनिटे २१ महिला आणि साकारली ४०० वर्गफूटात भव्य रांगोळी

71

२१० मिनिटे २१ महिला आणि साकारली ४०० वर्गफूटात भव्य रांगोळी

साकोलीत गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला संस्कार भारतीचा अनोखा संस्कृती संदेश

साकोली / महाराष्ट्र
दि. 21.03.2023
आशिष चेडगे – संवाददाता ग्लोबल महाराष्ट्र न्यूज

सविस्तर बातमी साकोली : ०३ तास ३० मिनिटे, एकुण २१ महिला, तब्बल ५० किलो रांगोळी आणि ४० × १० वर्गफूटात भव्य हिंदू संस्कृतीमय गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला साकारली संस्कार भारतीच्या महिलांनी साकोली बस स्थानक येथे भव्य रांगोळी. सदर रांगोळी बघण्यासाठी प्रवाशांसह शहरातील नागरिकांनी एकच गर्दी केली आहे. हा उपक्रम आहे साकोली संस्कार भारतीच्या महिलांचा की साडेतीन तासात हा विक्रम करून दाखविला.

 


५८ वर्षांपासून रहिवासीला ग्रामपंचायतने दाखविले “या नावाचे व्यक्ती गावात नाही”


 

गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला ( २१ मार्च ) साकोली बस स्थानक येथे शहरातील संस्कार भारतीच्या महिलांनी मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी एक रांगोळीतून अनोखा संस्कृतीमय संदेश दिला. सकाळी ९ वाजता या भव्य रांगोळी ( भुअलंकरण ) काढण्यास सुरुवात झाली, येथे एकुण ५० किलो विविध रंगांची रांगोळी वापरून ही भव्य ४०० वर्गफूटात ४० × १० फुट भव्य रांगोळी साकारली आहे. रांगोळीच्या मधोमध “मिळुनी आपण गुडी उभारू, होऊनी सारे एक, सर्वीकडे पोचवू आपण पर्यावरण संदेश” असे शब्द रेखाटले असून यात हिंदू संस्कृतीमय शोभिवंत भगवा ध्वजही काढण्यात आला. ही भव्य दिव्य रांगोळीचे उदघाटन माजी आमदार डॉ. हेमकृष्ण कापगते, आगार व्यवस्थापक माधूरी साखरवाडे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते राजेश ढोमणे, डॉ. शकुंतला कापगते, सेवानिवृत्त मुख्याध्यापक आर. बी. तिडके, माजी नगरसेवक ऍड. मनिष कापगते, अनिल तिडके यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून झाले. रांगोळी सकाळी ९ वाजता सुरू होऊन १२:३० ला संपन्न झाली, या रांगोळी रेखाटनात संस्कार भारतीच्या महिला सदस्य चंदा मुरकुटे, अनिता चौधरी, मयुरी द्रुगकर, कल्पना कापगते, देवश्री कापगते, संगीता भांडारकर, शेवंता नंदनवार, रेखा तिडके, डिम्पल तिडके, शकुंतला तिडके, शालू तिडके, शमिला बोरकर, वसुंधरा तिडके, पद्मा तिडके, सुषमा मासूरकर, मनिषा काशिवार, पुर्णिमा द्रुगकर, यशस्वी तिडके, शकुंतला कापगते, राधिका ढोमणे व माधूरी ढोमणे यांनी साडेतीन अर्थात २१० मिनिटात ही भव्य रांगोळी साकारून गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला संस्कार भारतीचा साकोलीत अनोखा विक्रम स्थापन केला. सदर भव्य दिव्य रांगोळी बघण्यासाठी प्रवाशांसह शहरातील शेकडोंच्यावर दर तासाला महिला नागरीक येत असून या कलाकृतीबद्दल प्रशंसा व कौतुकाभिनंदन करीत आहोत हे विशेष.