५८ वर्षांपासून रहिवासीला ग्रामपंचायतने दाखविले “या नावाचे व्यक्ती गावात नाही”

94

५८ वर्षांपासून रहिवासीला ग्रामपंचायतने दाखविले “या नावाचे व्यक्ती गावात नाही”

ग्रामपंचायत महालगांवचा अफलातून कारनामा

साकोली / महाराष्ट्र
दि. 19.03.2023
रिपोर्ट:- आशिष चेडगे संवाददाता ग्लोबल महाराष्ट्र न्यूज

सविस्तर साकोली : गावातीलच ५८ वर्षांपासून रहिवासीला ग्रामपंचायतने दाखविले “या नावाचे व्यक्ती गावात नाही” असा विचित्र महाप्रताप ग्रामपंचायत महालगांवने करून दाखवित त्याला घरकुलापासून वंचित ठेवले. याची तक्रार खंड विकास अधिकारी यांकडे दाखल झाली असून हा महाप्रतापी कारनामा करणा-यांवर काय कारवाई केली जाते याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागलेले आहे.


साकोलीजवळ बिबट बछड्याला अज्ञात वाहनाची धडक ; झाला मृत्यू



          निताराम धर्मा शिवणकर वय ५८ रा. महालगांव तह. साकोली हे तब्बल ५८ वर्षांपासून रहिवासी असून यांचे नावे कर पावती, गाव नमुना ०८, रहाते घर आहे. यांनी सन २०१८ – १९ ला घरकुलासाठी अर्ज केला. परंतू २१.०५.२०१९ ला ग्रामपंचायत महालगांवने सदर व्यक्ती गावात नाही असा खोटा व बनावटी ठराव पारीत करून कोणत्याही सदस्यांना विश्वासात न घेता विचित्र कारनामा चव्हाट्यावर आणित सदर माती कौल व मोडकळीस आलेल्या घरमालकास घरकुलापासून वंचित ठेवले. याची दि. १६ मार्च २०२३ ला खंड विकास अधिकारी यांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. याचप्रमाणे गावातीलच काहींचे पक्के घर असूनही त्यांना घरकुलास पात्र दाखवित ग्रामपंचायत महालगांवने नविन आविष्कार स्थापन केला आहे. तसेच याबाबद ग्रामपंचायत महालगांव येथे सदस्य राहुल टेंभुर्णे हे ठराव मागण्यास गेले असता ठराव दूरूनच दाखवित त्याची फोटोही सदस्यांना काढण्यास ग्रामपंचायत महालगांव ग्रामसेवकाने मज्जाव केला. अखेर सदस्याने सदर ठराव प्रत पंचायत समिती येथून आणली. तक्रारदार निताराम धर्मा शिवणकर यांची मागणी आहे की सदर खोटे बनावटी ठराव मंजूर करणा-यांवर उच्चस्तरीय कारवाई करण्यात यावी. आणि शासन नियमानुसार घरकुल योजनेचा लाभ मिळण्यात यावा. आता या संतप्त प्रकरणावर काय कारवाई केली जाते याकडे समस्त ग्रामस्थांचे लक्ष लागलेले आहे.