घुग्घुस काँग्रेस कमेटीच्या नेत्यांवर गुन्हा दाखल करा.!

60

घुग्घुस काँग्रेस कमेटीच्या नेत्यांवर गुन्हा दाखल करा.!

ट्रान्सपोर्ट हायवा चालक/मालक युनियनची मागणी..

चंद्रपुर/महाराष्ट्र
दि. 06 अक्टूबर 2022
रिपोर्ट:- जिला संवाददाता

सविस्तर बातमी:-   घुग्घुस काँग्रेस कमेटीच्या नेत्यांवर गुन्हा दाखल करा अशी मागणी ट्रान्सपोर्ट हायवा चालक/मालक युनियन घुग्घुसतर्फे ठाणेदार बबन पुसाटे यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.

घुग्घुस काँग्रेस कमेटीचे शहराध्यक्ष राजू रेड्डी व किसन सेलचे जिल्हाध्यक्ष रोशन पाचारे यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने ठाणेदार बबन पुसाटे यांना निवेदन देऊन बालाजी ट्रान्सपोर्टच्या संचालकावर कोळसा तस्करीचा गुन्हा दाखल करा अशी मागणी केली. यावेळी राजू रेड्डी, रोशन पचारे, सय्यद अनवर, अलीम शेख, रोशन दंतलवार, विशाल मादर, नुरुल सिद्दीकी, दीपक पेंदोर, देव भंडारी, अनुप भंडारी, साहिल सय्यद, सुनील पाटील, राकेश डाकूर, आरिफ शेख उपस्थित होते.

ट्रक चालकाने कोळश्याची अफरातफर केली. 

  • गुप्ता कोल वाशरी ते ताडाळी सायडींग पर्यंत कोळसा वाहतुकीचे काम ट्रक चालक/ मालक स्वतःच्या ट्रकने करतात. ट्रक चालक/मालकांचे ट्रक हे बालाजी ट्रान्सपोर्ट व सप्रा ट्रान्सपोर्टमध्ये चालतात सर्व ट्रान्सपोर्टींगचा व्यवसाय ट्रक व चालक यांच्यावर अवलंबून आहे.

 

  • २६ सप्टेंबर रोजी ट्रक क्र. एमएच ३४ बीजी ६२२९ या ट्रक चालकाने कोळश्याची अफरातफर केली. याबाबत कळताच ट्रकचे मालक रोहित जयस्वाल यांनी ही माहिती स्वतः पोलीसांना दिली तसेच तक्रार दिली. ट्रक मालक रोहित जयस्वाल यांनी स्वतः चालकास पकडून पोलीसांच्या स्वाधीन केले. पोलीसांनी तपास करून आरोपींना अटक केली.


राजकीय द्वेषातुन बालाजी ट्रान्सपोर्टच्या संचालकाची नाहक बदनामी करण्यात येत आहे.

  • परंतु काँग्रेस नेत्यांनी या घटनेला राजकीय रंग दिला. या घटनेशी कोणताही संबंध नसणाऱ्या बालाजी ट्रान्सपोर्टच्या संचालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली व बदनामी केली. राजकीय द्वेषातुन बालाजी ट्रान्सपोर्टच्या संचालकाची नाहक बदनामी करण्यात येत आहे. हा प्रकार अतिशय नींदनीय असून याचा आम्ही निषेध करतो व अश्या काँग्रेसच्या नेत्यांवर कडक कारवाई करून गुन्हा दाखल करावा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

यावेळी ट्रान्सपोर्ट हायवा चालक/मालक युनियन घुग्घुसचे पदाधिकारी उपस्थित होते.